झूलन गोस्वामीची ट्वेंटी20 क्रिकेटमधून निवृत्ती

वृत्तसंस्था
Thursday, 23 August 2018

नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघाची प्रमुख वेगवान गोलंदाज झूलन गोस्वामी हीने आज आतंरराष्ट्रीय ट्वेंटी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. बीसीसीआयतर्फे तिच्या निवृत्तीची घोषणा करण्यात आली. 

नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघाची प्रमुख वेगवान गोलंदाज झूलन गोस्वामी हीने आज आतंरराष्ट्रीय ट्वेंटी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. बीसीसीआयतर्फे तिच्या निवृत्तीची घोषणा करण्यात आली. 

झूलनने तिच्या आतंरराष्ट्रीय कारकिर्दीत 68 सामने खेळले असून त्यात तिने 21.94च्या सरासरीने 56 बळी घेतले आहेत. 2012मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिने 11 धावा देत 5 बळी घेतले आहेत. हे तिची सर्वोत्तम कामगिरी आहे. तिने 2006मध्ये डर्बी येथे इंग्लंडविरुद्ध आतंरराष्ट्रीय ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्यांच्या यादीत ती तिसऱ्या स्थानावर आहे. जूनमध्ये 2018मध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत बांगलादेशविरुद्ध ती शेवटचा सामना खेळली होती. 

झूलनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेतले आहेत. तसेच एकदिवसीय क्रिकेटमध्ये 200 बळी घेणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू आहे. तिने 10 कसोटी सामनेही खेळले आहेत. त्यात तिने 16.62च्या सरासरीने 40 बळी घेतले आहेत.

संबंधित बातम्या