विश्वकरंडकासाठी 'हा' यष्टीरक्षक संघात पाहिजेच : झहीर खान

वृत्तसंस्था
Thursday, 27 September 2018

इंग्लंडमध्ये होणारा विश्वकरंडक काही महिन्यांवर आला असताना भारतीय संघाने संघबांधणीची सुरवात कोली आहे. अशातच भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानने मात्र, रिषभ पंतला विश्वकरंडकासाठी भारतीय संघात स्थान देण्यात यावे असे मत व्यक्त केले आहे. 

दुबई : भारतीय संघात सध्या मधल्या फळीत अनेक प्रयोग सुरु आहेत. आशिया करंडकाची अंतिम फेरी एका दिवसावर येऊन ठेपली असतानाही भारतीय संघात चौथ्या क्रमांकावर कोण फलंदाजी करणारा हे निश्चित नाही. इंग्लंडमध्ये होणारा विश्वकरंडक काही महिन्यांवर आला असताना भारतीय संघाने संघबांधणीची सुरवात कोली आहे. अशातच भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानने मात्र, रिषभ पंतला विश्वकरंडकासाठी भारतीय संघात स्थान देण्यात यावे असे मत व्यक्त केले आहे. 

''माझ्यामते अजून 25 सामन्यांनंतर रिषभ पंतला भारतीय संघात स्थान मिळू शकते. संघ व्यवस्थापनाने आजवर मधल्या फळीत अनेक प्रयोग केले आहेत. पंतमध्ये सामन्याला वेग देण्याची कला आहे. शेवटच्या षटकांमध्ये फटकेबाजी करण्याची गरज असते तर रिषभ पंत मोठे षटकार खेचू शकतो,'' असे मत झहिरने व्यक्त केले आहे. 

विश्वकरंडक अवघ्या काही महिन्यांनी आहे. त्यातच भारतीय संघाला इंग्लंड दौऱ्यात चांगली कामगिरी करण्यात अपयश आल्याने मधल्या फळीतील प्रश्न लवकरात लवकर सोडवणे गरजेचे आहे.

संबंधित बातम्या