चहल म्हणाला आमचं ठरलं! वाचा कोणी घेतली फिरकीपटूची विकेट

सुशांत जाधव
Saturday, 8 August 2020

फोटो शेअर करत यासंदर्भातील माहिती दिली. कुटुंबियांच्या साक्षीनं आम्ही दोघांनी एकमेकांना होकार दिला, या कॅप्शनसह युजवेंद्र चहलने  धनश्री वर्मासोबतचा फोटो शेअर केलाय.  

भारतीय संघातील फिरकीपटू युजवेंद्र चहलने लॉकडाउनच्या ब्रेकमध्येच आपल्या आयुष्याचा जोडीदार निवडला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने आपल्या आयुष्याच्या जोडीदारासोबतचा एक फोटो शेअर करत यासंदर्भातील माहिती दिली. कुटुंबियांच्या साक्षीनं आम्ही दोघांनी एकमेकांना होकार दिला, या कॅप्शनसह युजवेंद्र चहलने  धनश्री वर्मासोबतचा फोटो शेअर केलाय.  

आयपीएल ही जगातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा - वसीम अक्रम

चहलने शेअर केलेल्या फोटोवर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. त्याचा सहकारी आणि भारतीय संघातील युवा फलंदाज केएल राहुल (KL Rahul) पासून ते अष्टपैलू हार्दिक पांड्यापर्यंत सर्व सहकारी मंडळी त्याला शुभेच्छा देत आहेत. चहल आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळताना दिसते.  लॉकडाउनच्या दरम्यान सोशल मीडियावर तो चांगलाच सक्रिय असल्याचे पाहायला मिळाले होते.  

चॅम्पियनशिप गाजवणाऱ्या पाक कर्णधाराला बूट उचलायला लावणे अख्तरला खटकलं​

युजवेंद्र चहल-धनश्री वर्मा दोघांच्या कुटुंबियांसह  पाहण्याचा कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी दोघांनी एकमेकांना होकार दिला. साखरपुड्याच्या पूर्वी कुटुंबियांच्या साक्षीने मुलगा-मुलगी एकमेकांना पंसती दर्शवल्यानंतरचा कार्यक्रमाला 'रोका सेरेमनी' असे म्हणतात. रोकासेरेमनीची झलक, अशा आशयाची पोस्ट युजवेंद्रने शेअर केली आहे. धनश्री वर्माने देखील तिच्या इन्टा अकाउंटवरुन दोघांचा फोटो शेअर केला आहे. धनश्री एक डॉक्टर असून तिचे एक यू-ट्यूब चॅनेल देखील आहे. लॉकडाउनच्या काळात ऑनलाइनच्या कार्यक्रमातही ही जोडी दिसली होती.  


​ ​

संबंधित बातम्या