त्याने अपशब्द वापरला नव्हता; युवीनं केली शुभमनची पाठराखण 

सुशांत जाधव
Saturday, 1 August 2020

दिल्ली विरुद्धच्या सामन्यात मैदानातील पंचांच्या निर्णयाविरुद्ध  शुभमनने हुज्जत घातली होती. या प्रकरणात त्याच्यावर दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली.

 
भारतीय संघाचा माजी अष्टपैलू युवराज सिंग याने युवी क्रिकेटर  शुभमन गिल याची पाठराकण केली आहे. रणजी करंडक स्पर्धेदरम्यान शिभमन गिलने मैदानात राग व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले होते. रणजी सामन्यादरम्यान शुभमनने कोणालाही अपशब्द वापरला नव्हता. तो शिवीगाळ करणारा खेळाडू नव्हे, असे युवीने म्हटले आहे. पंजाब क्रिकेट असोसिएशन द्वारा आयोजित 21 दिवसांच्या शिबिरात युवी युवा वर्गाला मार्गदर्शन करणार आहे. याच पार्श्वभूवर त्याने रणजी करंडक स्पर्धेत दिल्ली विरुद्धच्या सामन्यात शुभमन गिलसंदर्भात घडलेल्या प्रकारावर भाष्य करताना त्याची पाठराखण केल्याचे पाहायला मिळाले.  20 वर्षीय शुभमन गिल प्रतिभावंत खेळाडू आहे, असेही युवीने म्हटले आहे. 

फिफा झाली मेहरबान ; 211 देशांना देणार आर्थिक सहाय्य

दिल्ली विरुद्धच्या सामन्यात मैदानातील पंचांच्या निर्णयाविरुद्ध  शुभमनने हुज्जत घातली होती. या प्रकरणात त्याच्यावर दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली. चाहत्यांनाही शुभमनच्या वर्तनामुळे आश्चर्याचा धक्का बसला होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्यावर टीकाही झाली होती.या प्रकरणावर युवी म्हणाला की, हा सर्व प्रकार घडला त्यावेळी मी मैदानातच होतो. शुभमनने कोणाच्याही विरोधात असभ्य भाषा वापरली नव्हती. (शिवीगाळ करणे) त्याने केवळ पंचांच्या निर्णयाविरुद्ध प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले होते. 

स्टुअर्ट ब्रॉड 500 विकेट घेणारा सातवा गोलंदाज   

नेमक काय झालं होतं

दिल्ली विरुद्धच्या रणजी सामन्यात शुभमन गिलला पंचांनी बाद दिले. यावेळी त्याने मैदान सोडण्यास नकार दिला होता. या कृत्यामुळे त्याच्यावर दंडात्मक कारवाई झाली होती. सामन्यातील मानधनातील 100 टक्के रक्कम दंड स्वरुपात आकारली होती.
 


​ ​

संबंधित बातम्या