#ThisDayThatYear : युवराजचे सलग सहा खणखणीत षटकार

वृत्तसंस्था
Wednesday, 19 September 2018

युवराजने या 36 धावांसह 12 चेंडूत अर्धशतक झळकाविले होते. युवराजचा हा विक्रम अजूनही अबाधित आहे.

भारताला ट्वेंटी-20 आणि एकदिवसीय विश्वकरंडक जिंकून देणारा अष्टपैलू क्रिकेटपटू युवराजसिंगने इंग्लंडचा गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडला मारलेले ते सलग सहा षटकार आजही सर्वांच्या स्मरणात आहेत. त्याच्या याच कामगिरीला आज 11 वर्षै पूर्ण झाली.

दक्षिण आफ्रिकेत झालेल्या ट्वेंटी-20 विश्वकरंडक स्पर्धेत इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात ब्रॉडच्या गोलंदाजीवर युवराजने ही ऐतिहासिक कामगिरी केली होती. भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील हा सुवर्ण क्षण आहे. डर्बनच्या मैदानावर झालेल्या सामन्यात इंग्लंडच्या अॅण्ड्यू फ्लिन्टॉफने युवराजला डिवचल्यानंतर ब्रॉडला त्याने सलग सहा षटकार खेचले होते.

युवराजने या 36 धावांसह 12 चेंडूत अर्धशतक झळकाविले होते. युवराजचा हा विक्रम अजूनही अबाधित आहे. 


​ ​

संबंधित बातम्या