युवी म्हणाला, भेदभावाला मनात थाराच नाही, तरीही कोण दुखावलं असेल तर..

टीम ई-सकाळ
Friday, 5 June 2020

पल्या हटके फलंदाजीसह शाब्दिक कोटीनं अनेकांची मनं जिंकणारा युवराज सिंग जातीवाचक विधानामुळं चर्चेत आला. रोहित शर्मासोबतच्या एका कार्यक्रमात युजवेंद्र चहलला उद्देशून त्याने वापरलेल्या शब्दामुळे युवराज सिंगला ट्रोल करण्यात आले. #युवराज_सिंह_माफी_मांगो ट्रेंडमधून नेटकऱ्यांनी त्याच्याविरोधात एक मोहिमच उभी केली.

चंदिगड : आपल्या हटके फलंदाजीसह शाब्दिक कोटीनं अनेकांची मनं जिंकणारा युवराज सिंग जातीवाचक विधानामुळं चर्चेत आला. रोहित शर्मासोबतच्या एका कार्यक्रमात युजवेंद्र चहलला उद्देशून त्याने वापरलेल्या शब्दामुळे युवराज सिंगला ट्रोल करण्यात आले. #युवराज_सिंह_माफी_मांगो ट्रेंडमधून नेटकऱ्यांनी त्याच्याविरोधात एक मोहिमच उभी केली. या प्रकारानंतर आता युवराज सिंगने स्पष्टीकरण दिले आहे. मी कोणत्याही प्रकारचा भेदभाव मानत नाही. माझ्या विधानाचा चूकीचा अर्थ लावण्यात आला. कोणाला दुखावण्याचा त्यामागे हेतू नव्हता, असे सांगत त्याने माफी देखील मागितली आहे.  

अमेरिकेतील 'त्या' घटनेवर व्यक्त होताना फेडरर झाला निशब्द! 

युवराज सिंगने ट्विटरच्या माध्यमातून आपली बाजू मांडली आहे. त्याने ट्विटमध्ये लिहिलंय की, मी रंग, जात-पात किंवा लिंगभेद मानत नाही. जीवनात सर्वांशी चांगले वागयचा हा माझ्या जीवनाचा मंत्र आहे. मी प्रत्येक व्यक्तीचा आदर करतो. मी सहकाऱ्यांसोबत उच्चार केलेला शब्दाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. जबाबदार भारतीय नागरिकाच्या नात्याने मी माझी बाजू मांडत आहे. अनावधानाने माझ्याकडून काही चूक झाली असेल. माझ्या शब्दांमुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर  मी मनापासून माफी मागतो. देश आणि देशातील नागरिकांबद्दलचे माझ्या मनातील प्रेम कायम राहिल, असा भावनिक संदेश देत युवीने माफी मागितली आहे. 
रोहित शर्मासोबतच्या एका व्हिडिओतील आक्षेपार्ह संभाषणाचा युवीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.  

वर्णभेदाच्या मुद्यावर केएल राहुलने शेअर केली भावनिक पोस्ट

#युवराज_सिंह_माफी_मांगो ट्रेंडच्या माध्यमातून त्याला ट्रोल करण्यात आले. याप्रकरणी युवीच्या विरोधात तक्रार देखील दाखल करण्यात आली. हांसीचे पोलिस अधीक्षक लोकेंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 मे रोजी युवराज सिंगच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. 


​ ​

संबंधित बातम्या