आता झोप घेऊ शकतो, युवीनं व्यक्त केली मनातील भावना

टीम ई-सकाळ
Sunday, 21 June 2020

क्रिकेटमुळे होणारी मानसिक समाधान मिळेनासे झाले होते. मी स्वत:वर ताण देत होतो.  निवृत्त व्हावे की आणखी खेळावे अशा संभ्रमात अडकलो होतो, असे युवी गौरव कपूरसोबत संवाद साधताना म्हणाला.

नवी दिल्ली : इंग्लंडमध्ये रंगलेल्या विश्वचषक सामन्यात ज्या दिवशी भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले त्याच्या दुसऱ्या दिवशीच युवराज सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत होत असल्याची घोषणा केली. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या खेळाडूंच्या यादीत युवी होता पण त्याक्षणी तो निवृत्ती घेईल, असे कोणालाही वाटले नव्हते. निवृत्तीच्या घोषणेनंतर बराच अवधी घेतल्यानंतर युवीने या निर्णयापर्यंत पोहचण्याचा खुलासा केलाय.

जर पुरुषांची स्पर्धा स्थगित झाली तर आमची स्पर्धाही संकटात येईल : पेरी

गौरव कपूरच्या '22 यॉर्न्स' या कार्यक्रमात युवराज सिंग सहभागी झाला होता. निवृत्तीनंतर निवांत झोपू शकलो, असे युवीने या कार्यक्रमात सांगितले. तो म्हणाला की, ज्या दिवशी मी निवृत्तीची घोषणा केली त्यादिवशी मी स्वतंत्र झालो. माझ्यासाठी तो क्षण भावनात्मक होता. त्यावेळीची भावना मी शब्दात मांडू शकत नाही. आयुष्यात तुम्ही वेगाने पुढे सरकत असता तेव्हा तुम्हाला काही गोष्टींची जाणीव नसते. अचानक आयुष्यात याच्यापेक्षा विपरित गोष्टी घडतात तेव्हा तुम्हाला नेमकं काय झाल हेच कळत नाही.

#क्रिकेट_डायरी : वनडेत दमदार पदार्पण करणारे 'त्रिदेव'

क्रिकेटमुळे होणारी मानसिक समाधान मिळेनासे झाले होते. मी स्वत:वर ताण देत होतो.  निवृत्त व्हावे की आणखी खेळावे अशा संभ्रमात अडकलो होतो, असे युवी गौरव कपूरसोबत संवाद साधताना म्हणाला. तो पुढे म्हणाला की, निवृत्तीनंतर क्रिकेट खेळत नसल्याची उणीव भासली. पण देशासाठी अनेक वर्ष खेळल्यामुळे याचा फार पश्चाताप वाटत नाही. कारकिर्दीत आणि त्यानंतर सुद्धा चाहत्यांना मला खूप प्रेम दिले. यासाठी मी स्वत:ला भाग्यशाली समजतो, असेही युवीने म्हटले आहे.  


​ ​

संबंधित बातम्या