तू योद्धा आहेस आणि कॅन्सरवर मात करशील; युवीकडून संजू बाबाला धीर

सुशांत जाधव
Wednesday, 12 August 2020

8 ऑगस्ट रोजी संजय दत्तला श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी त्याची कोविड-19 चाचणीही घेण्यात आली. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली.

भारतीय संघाचा माजी क्रिकेटर युवराज सिंगने (Yuvraj Singh) बॉलिवूड अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) याला ट्विटरचच्या माध्यमातून धीर दिलाय. संजय दत्तला तिसऱ्या स्टेजचा फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले आहे. कर्करोगावरील उपचारासाठी संजय दत्त अमेरिकेला जाणार असल्याचेही वृत्त आहे. या आजाराची वेदना मला माहित आहे. संजय दत्त यावर मात करेल, असा विश्वास युवीने व्यक्त केलाय. यासंदर्भात त्याने ट्विटवरुन प्रतिक्रिया दिली आहे. या आजारातून संजय दत्त लवकर तंदूरुस्त व्हावा, यासाठी प्रार्थना करु, असा उल्लेखही युवीने आपल्या ट्विटमध्ये केलाय.  

बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला कॅन्सर; कोरोना निगेटिव्ह पण वेगळ्याच आजाराचे निदान

2011 मध्ये युवराज सिंगलाही  फुफ्फुसाचा कर्करोग झाला होता. या आजावर मात करत युवीने पुन्हा भारतीय संघात स्थान मिळवले होते. कर्करोगाची झुंज देणाऱ्या युवीने संजय दत्तला योद्धा अशी उपमा देत यातून बरा होशील, असा विश्वास दिलाय. युवराज सिंहने ट्विटमध्ये लिहिलंय की,  'संजय दत्त एक फायटर (योद्धा) आहे आणि तो या आजारालाही झुंज देईल. या आजारातील वेदना जाणतो. संजय दत्त मजबूत असून तो यातून निश्चित सावरेल, अशा आशयाचे ट्विट युवीने केले आहे. 

8 ऑगस्ट रोजी संजय दत्तला श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी त्याची कोविड-19 चाचणीही घेण्यात आली. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली. पण संजूबाबाला कर्करोग असल्याचे निदान झाले होते. 10 ऑगस्ट रोजी त्याला घरी सोडण्यात आले असून पुढील उपचारासाठी तो अमेरिकेला जाणार असल्याचे वृत्त आहे.  
 


​ ​

संबंधित बातम्या