क्वारंटाइननंतर 100 टक्के पार्टी होणारच!; युवीनं घेतली भज्जीची फिरकी

टीम ई-सकाळ
Friday, 3 July 2020

सचिनने चक्क पंजाबी भाषेत ट्विट करत भज्जीला शुभेच्छा दिल्या. माझ्या चांगल्या मित्रांच्या यादीत तुझा समावेश आहे, असा उल्लेखही सचिने आपल्या ट्विटमध्ये केलाय.

आपल्या फिरकीने विरोधकांना नाचायला लावत यशस्वी गोलंदाजाच्या यादीत स्थान मिळवणाऱ्या हरभजन सिंगवर शुभेच्छांची बरसात होत. आहे. 40 व्या वाढदिवसाला अनेक दिग्गज क्रिकेटर्स आणि इतर क्षेत्रातील लोकप्रिय व्यक्ती भज्जीला शुभेच्छा देत असताना भारताचा माजी अष्टपैलू युवराज सिंगने हटके अंदाजात शुभेच्छा दिल्याचे पाहायला मिळाले.  मैदानाप्रमाणेच युवी-भज्जी सोशल मीडियावरही एकमेकांची मजाक-मलस्ती करत असतात. हा प्रकार पुन्हा एकदा अनुभवायला मिळाला. भज्जीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने युवीने आपल्या अधिकृत अकाउंटवरुन एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत त्याने भज्जीसोबतच्या आठवणींना उजाळा दिलाय. एवढेच नाही तर हटके शुभेच्छा देताना क्वारंटाइननंतर पार्टी मागायला युवराज विसरला नाही.  

धक्कादायक! मेस्सी बार्सिलोनाचा निरोप घेणार? 

भज्जीचा जन्म 3 जूलै 1980 मध्ये पंजाबमधील जालंधर येथे झाला. आज 41 व्या वर्षात पदार्पण केले. यावरही युवीने भज्जीची फिरकी घेतली. तू नेमका 40 वर्षांचा झालास की 47 असा प्रश्न त्याने उपस्थितीत केलाय. मैदानातील खेळीनं तू 'सिंग इज किंग' असल्याचे सिद्ध केल आहेस. तुझ्यासोबतच्या अविस्मरणीय आठवणी या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करतोय. क्वारंटाइननंतर 100 टक्के पार्टी तर होणारच आहे, असा संदेशही युवीने लिहिलाय.  

2011 वर्ल्डकप फिक्सिंग आरोपाचा बार फुसका: श्रीलंकेनेच घेतले आरोप मागे 

युवराज सिंहच्या हटके पोस्टशिवाय मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीसह अन्य काही क्रिकेटर्संनी भज्जीला जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सचिनने चक्क पंजाबी भाषेत ट्विट करत भज्जीला शुभेच्छा दिल्या. माझ्या चांगल्या मित्रांच्या यादीत तुझा समावेश आहे, असा उल्लेखही सचिने आपल्या ट्विटमध्ये केलाय. भज्जीने अनेक सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवून दिला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2008 मध्ये झालेल्या मंकी गेट प्रकरण चांगलेच गाजले होते. आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने यावरही भाष्य केले आहे. ते प्रकरण इतके मोठे नव्हत. विनाकारण त्याकडे 'वर्ल्ड वॉर 3' प्रमाणे पाहिले गेले, असे भज्जीने म्हटले आहे. 


​ ​

संबंधित बातम्या