शतकाच्या शहेनशहाला युवीनं दिलं अनोख शतक करण्याचे चॅलेंज

टीम ई-सकाळ
Tuesday, 2 June 2020

भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू युवराज सिंग आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हे गेल्या काही दिवसांपासून एकमेकांसोबत चॅलेंज-चॅलेंज गेम खेळत आहेत.  आता युवराज सिंगने सचिन तेंडुलकरला एक अनोखेच चॅलेंज दिले आहे.

मुंबई : कोरोनाची खबरदारी म्हणून देशभरात लॉकडाउन करण्यात आले. परिणामी सामान्य नागरिकांप्रमाणे लोकप्रिय खेळाडूंना देखील आपापल्या घरी बंदिस्त होण्याची वेळ आली. विरंगुळा नसल्यामुळे अनेक क्रीडापटू सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांना चॅलेंज देत आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करताना पाहायला मिळत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू युवराज सिंग आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हे गेल्या काही दिवसांपासून एकमेकांसोबत चॅलेंज-चॅलेंज गेम खेळत आहेत.  आता युवराज सिंगने सचिन तेंडुलकरला एक अनोखेच चॅलेंज दिले आहे. युवराज सिंगने हातात लाटणे घेऊन चेंडू 100 वेळा टोलवण्याचे चॅलेंज सचिन तेंडुलकरला दिले आहे.

खेलरत्न पुरस्कार नामांकन मिळाल्यावर हिटमॅन रोहितनं दिली अशी प्रतिक्रिया

युवराज सिंगने इंस्टाग्राम या सोशल माध्यमावरून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला एक नवीन चैलेंज दिले आहे. इंस्टाग्रामवर युवराजने एक व्हिडीओ अपलोड केला आहे. यामध्ये युवराज डोळ्यावर पट्टी बांधून स्वयपाक घरातील लाटण्याच्या साहाय्याने चेंडू टोलवताना दिसत आहे. हेच चैलेंज युवराजने सचिनला दिले असून, मास्टर तू मैदानावरील सर्व विक्रम मोडले आहेस...मात्र आता माझा हा किचन मधील शतकी विक्रम मोडायची वेळ आहे. माफ कर..पूर्ण व्हिडिओ अपलोड करत नाही, कारण 100 ची अंक मोजण्यासाठी वेळ लागेल. आशा करतो की स्वंयपाक घरातील इतर वस्तूंची तोडफोड होणार नाही, असा उल्लेखही युवीने केलाय. 

संगकारा म्हणाला, गोंधळ धोनीमुळे झाला नव्हता तर...

यापूर्वी देखील युवराज सिंगने बॅटच्या एजवर चेंडू टोलवण्याचे चैलेंज सचिनला दिले होते. त्यावेळेस सचिनने डोळ्यावर पट्टी बांधून, बॅटच्या एजवर चेंडू टोलवण्याचे युवराजचे चॅलेंज पूर्ण केले होते. याच्याही पुढे जाऊन सचिनने युवराजचे चॅलेंज खूप सोपे असल्याचे म्हटले होते.  


​ ​

संबंधित बातम्या