भारतीय पंचगिरीचा झेंडा आता नितीन मेनन यांच्या खांद्यावर

टीम ई-सकाळ
Tuesday, 30 June 2020

याअगोदर माजी कर्णधार श्रीनिवास वेंकटराघवन आणि सुंदराम रवी हे अगोदरचे पंच आहेत. रवी यांना गतवर्षी एलिट पॅनेलमधून दूर करण्यात आले होते. 

मुंबईः सुनील गावसकर, कपिलदेव, सचिन तेंडुलकर ते विराट कोहली, रोहित शर्मा असे एक ना अनेक महान खेळाडूंच्या भारताचे क्रिकेट विश्वावर कमालीचे वर्चस्व मात्र एका क्षेत्रात आपला देश फारच मागे आहे. ते क्षेत्र म्हणजे एलिट पॅनेलमधील पंच !! तिकडे श्रीलंका, पाकिस्तानमधील पंच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्थान मिळवू शकतात पण भारतीय पंच नाही ही शोकांकिता आहे. पण नितीन मेनन यांच्या रुपाने थोडासा दिलासा मिळाला. मेनन यांची यंदाच्या मोसमासाठी एलिट पॅनेलमध्ये निवड झाली. वास्तविक ते केवळ तिसरे भारतीय पंच ठरले आहेत. 

बीसीसीआयला विस्मरण झाले की काय? कधी होणार विवोची गच्छंती...

इंग्लंडच्या निजेल शॉर्ट यांचा कार्यकाळ संपल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर मेनन यांना संधी मिळाली आहे.  36 वर्षीय मेनन यांनी आत्तापर्यंत तीन कसोटी, 24 एकदिवसीय आणी 16 ट्‌वेन्टी-20 सामन्यात पंचगिरी केलेली आहे. आयसीसीच्या एलिट पॅनेलमध्ये स्थान मिळवणारे ते तिसरे भारतीय पंच आहेत. याअगोदर माजी कर्णधार श्रीनिवास वेंकटराघवन आणि सुंदराम रवी हे अगोदरचे पंच आहेत. रवी यांना गतवर्षी एलिट पॅनेलमधून दूर करण्यात आले होते. आयसीसीचे सरव्यवस्थापक (क्रिकेट), जॉफ अलाद्रिक, माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर, सामनाधिकारी रंजन मदुगले आणि डेव्हिड बून यांनी मेनन यांची निवड केली. मेनन हे अगोदर एमिरेट्‌स्‌ आयसीसी आंतररराष्ट्रीय पॅनेलचे पंच होते. एलिट पॅनेलमध्ये स्थान मिळणे हे माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. क्रिकेटविश्वातील नामवंत पंचांसोबत पंचगिरी करायला मिळणे हे माझे स्वप्न होते, असे मेनन यांनी म्हटले आहे.


​ ​

संबंधित बातम्या