...अन् 36 वर्षीय भारतीय अंपायरचे स्वप्न सत्यात अवतरले

टीम ई-सकाळ
Monday, 29 June 2020

आयसीसीच्या एलीट पॅनेलमध्ये स्थान मिळवणारे ते तिसरे भारतीय पंच आहेत. यापूर्वी माजी कर्णधार  श्रीनिवास वेंकटराघवन आणि सुंदरम रवि यांना या यादीत स्थान मिळाले होते.

भारताचे युवा पंच नितिन मेनन यांना 2020-21 मधील क्रिकेट हंगामासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एलीट पॅनेलमध्ये स्थान मिळाले आहे. इंग्लंडच्या नायजेल लोंग यांच्या जागी 36 वर्षीय मेनन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मेनन यांनी   प्रथम श्रेणीमधील 57 सामन्यात पंच म्हणून काम पाहिले असून 3 कसोटी, 24 वनडे, 16 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यातील अनुभवासह आयपीएलमधील 40 सामन्यातही त्यांनी पंच म्हणून काम पाहिले आहे. आयसीसीच्या एलीट पॅनेलमध्ये स्थान मिळवणारे ते तिसरे भारतीय पंच आहेत. यापूर्वी माजी कर्णधार  श्रीनिवास वेंकटराघवन आणि सुंदरम रवि यांना या यादीत स्थान मिळाले होते.

बीसीसीआयला विस्मरण झाले की काय? कधी होणार विवोची गच्छंती...

आयसीसीचे जनरल मॅनेजर ज्योफ एलरडायस (अध्यक्ष), माजी क्रिकेटर आणि समालोचक संजय मांजरेकर आणि मॅच रेफ्री रंजन मदुगले आणि डेव्हिड बून यांच्या निवड समितीने मेनन यांची नियुक्ती केली. यापूर्वी मेनन आयसीसीच्या पंचाच्या एमिरेट्स पॅनलमध्ये सहभागी होते. आयसीसीने यासंदर्भात एक निवदेन जाहीर केले आहे. यात नितीन मेमन यांची प्रतिक्रियाही देण्यात आली आहे. एलीट पॅनलमध्ये स्थान मिळणे सन्मानजनक आहे. या गोष्टीचा अभिमान वाटतो. जगातील प्रमुख पंच आणि रेफ्रींसोबत काम करणे स्वप्न सत्यात उतरले, अशा शब्दांत मेमन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

क्रिकेटच्या मैदानातील 'हे' लाजिरवाणे रेकॉर्ड तुम्हाला माहित आहेत का?

मेनन मध्यप्रदेशच्या संघातून खेळले आहेत. मध्य प्रदेशच्या संघातून त्यांना केवळ दोन सामन्यात संधी मिळाली. यात त्यांच्या नावे अवघ्या 7 धावा आहेत. त्यानंतर मेनन 2006 मध्ये भारतीय क्रिकेट मंडळाकडून घेण्यात येणारी (बीसीसीआय) अखिल भारतीय अंपायर परीक्षेत यश मिळवले. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यांनी आपली दुसरी इनिंग सुरु केली. माजी आंतरराष्ट्रीय पंच नरेंद्र मेनन यांचे ते चिरंजीव आहेत. 2005 मध्ये मध्य प्रदेश  क्रिकेट संघाच्या पॅनलवर त्यांची पंच म्हणून नियुक्ती झाली होती. 2006 मध्ये बीसीसीआयची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर 2007-08 पासून ते देशांतर्गत क्रिकेटमध्ये पंचाची भूमिका बजावत होते.  


​ ​

संबंधित बातम्या