विरारमध्ये तरुण क्रिकेटपटूची आईसह आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 11 May 2019

विरार : नारंगीत राहणाऱ्या तरुण अष्टपैलू क्रिकेटरने आपल्या आईसह आत्महत्या केल्याची दुदैवी घटना घडली. मायलेकाच्या या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होतेय. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करुन तपास सुरु केला.

विनय प्रकाश चौगुले उर्फ दादू असे (25) तरुणाचे नाव होते तर सरस्वती प्रकाश चौगुले (42) आईचे नाव होते. प्राथमिक माहितीनुसार आर्थिक चणचण भासत असल्याने मायलेकाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय.

नारंगी येथील साई हेरिटेज या इमारतीत भाड्याने राहत असलेल्या खोलीत मायलेकाने विषारी औषध पिऊन आपलं आयुष्य संपवलं. त्यांनतर रात्री सव्वा आठच्या सुमारास त्याचा मृतदेह आढळला. विरार पोलिसांनी या मृतदेहाचे शवविच्छेदन केले असून आकस्मिक मृत्यूची नोंद केलीय.

संबंधित बातम्या