2011 च्या वर्ल्डकपचा 2013 मध्ये दिसलेला 'फ्लॅशबॅक' आठवतोय का?

टीम ई-सकाळ
Wednesday, 1 July 2020

भारत-श्रीलंका यांच्यातील विश्वचषकातील सामन्यावरुन सुरु असलेल्या आरोप-प्रत्यारोपादरम्यान दोन्ही संघातील विश्वचषकातील अनोख्या योगायोगाचा किस्सा तुम्हाला आठवला असेलच. 

भारत आणि श्रीलंका यांच्यात 2011 मध्ये झालेला विश्वचषकातील अंतिम सामना फिक्स होता, असा आरोप तत्कालीन श्रीलंकन क्रिडामंत्री  महिंदनंदा अलूठगमगे यांनी एका मुलाखतीमध्ये केला. ही विश्वचषक स्पर्धा भारतात झाली होती. दोन दशकाहून अधिककाळ क्रिकेटसाठी योगदान देणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसाठी ही स्पर्धा खूप महत्त्वपूर्ण होती. मुंबईतल वानखेडेच्या मैदानातील विजयाननंतर सचिनचा विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य असण्याचे स्वप्न पूर्ण झाले होते. या विश्वचषक स्पर्धेनंतर क्रिकेटच्या मैदानात आपल्याला आणखी एक कमालीचा योगायोग पाहायला मिळाला होता. या स्पर्धेनंतर बांगलादेशमध्ये रंगलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात विश्वजेतेपदासाठी भारत-श्रीलंका हे आशियाई देश पुन्हा समोरासमोर आल्याचे पाहायला मिळाले.  

2011 वर्ल्डकप फिक्सिंग प्रकरण: डी सिल्वाची कसून चौकशी, आता उपुल थरंगाचा नंबर ?

बांगलादेशमधील ढाकाच्या मैदानात रंगलेल्या या सामन्यात श्रीलंकेने भारतीय संघाचा हिशोब चुकता केला.मलिंगाच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेने ढाकाचे मैदान गाजवले. यावेळी देखील 2011 च्या विश्वचषकातील पराभवानंतर संघाने  वर्ल्ड कप विकण्याची भाषा करुन खळबळ माजवणारे महिंदनंदा अलूठगमगे हेच श्रीलंकेच्या क्रिडा मंत्रीपदावर होते. 2011 च्या विश्वचषकातील अंतिम सामन्यात श्रीलंकन संघाने जाणीवपूर्वक पराभूत झाल्याचा आरोप केल्यानंतर सध्या श्रीलंकन क्रिडा मंत्रालयाने या सामन्यासंदर्भात चौकशीचे आदेश दिले आहेत. या सामन्यात नेमके काय झाले होते हे चौकशीतून बाहेर येईलच. पण भारत-श्रीलंका यांच्यातील विश्वचषकातील सामन्यावरुन सुरु असलेल्या आरोप-प्रत्यारोपादरम्यान दोन्ही संघातील विश्वचषकातील अनोख्या योगायोगाचा किस्सा तुम्हाला आठवला असेलच. 

'धमक असणारा गोलंदाज लाळेशिवाय आमचा चेंडू स्विंग करु शकेल'

2011 च्या मर्यादित षटकाच्या विश्वचषकानंतर भारत श्रीलंका यांच्यात 2013 मध्ये झालेल्या टी-20 विश्वचषकात टक्कर झाली. हा अंतिम सामनाही चांगलाच रंगतदार झाला होता. 2011 च्या विश्वचषकात भारतीय कर्णधार महेंद्रसिंह धोनीने षटकार खेचत भारताला विश्वविजेता ठरवले होते. अगदी हा फ्लॅश बॅक दाखवत श्रीलंकेनेही टी-20 विश्वचषकावर नाव कोरले होते. 18 व्या षटकातील अश्विनच्या शेवटच्या चेंडूवर थिसेरा परेराने षटकार खेचत संघाला विजय मिळवून दिला होता. श्रीलंकेकडून संगकाराने सर्वाधिक धावसंख्या उभारली होती. त्याने 35 चेंडूत 52 धावांची नाबाद खेळी केली होती. तर थिसेरा परेराने 14 चेंडूत 23 धावा केल्या होत्या. यात त्याने तीन गगनचुंबी षटकार खेचले होते. 
 


​ ​

संबंधित बातम्या