#क्रिकेट_डायरी : वनडेत दमदार पदार्पण करणारे 'त्रिदेव' 

टीम ई-सकाळ
Saturday, 20 June 2020

#क्रिकेट_डायरी या हॅशटॅगमध्ये आज आपण अशा तीन खेळाडूंच्या कामगिरीवर नजर टाकणार आहोत ज्यांनी एकदिवसीय सामन्यातील पदार्पणात भारताकडून सर्वाधिक धावसंख्या उभारण्याचा पराक्रम करुन दाखवला. विशेष म्हणजे सध्याच्या घडीला यातील एकच बहाद्दर भारतीय संघासोबत आहे.  

मुंबई : भारतीय क्रिकेटमध्ये अनेक दिग्गजांनी आपल्या कामगिरीनं सर्वांचे लक्ष वेधून घेतले. क्रिकेट म्हटलं की आठवतो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, मैदानात दादागिरी करणारा सौरव गांगुली, संघ संकटात असताना मैदानात तग धरुन थांबण्याचा संयम दाखवणारा राहुल द्रविड, आपल्या धमाकेदार खेळीनं कसोटीत वनडेची खेळी साकारणारा विरेंद्र सेहवाग आणि सध्याच्या घडीला रोहित, विराट अन् अन्य काही युवा खेळाडू...#क्रिकेट_डायरी या हॅशटॅगमध्ये आज आपण अशा तीन खेळाडूंच्या कामगिरीवर नजर टाकणार आहोत ज्यांनी एकदिवसीय सामन्यातील पदार्पणात भारताकडून सर्वाधिक धावसंख्या उभारण्याचा पराक्रम करुन दाखवला. विशेष म्हणजे सध्याच्या घडीला यातील एकच बहाद्दर भारतीय संघासोबत आहे.  

#क्रिकेट_डायरी : कसोटीत सलामीला 'नाकाम' ठरलेले त्रिकूट

केएल राहुल

KL Rahul donates shoes to healthcare workers

विद्यमान कर्णधार विराट कोहलीचा लाडला म्हणजेच लोकेश राहुल याने पदार्पणात आपल्यातील कौशल्य दाखवून दिले होते. 11 जून 2016 रोजी लोकेश राहुलने झिम्बाव्बेविरुद्धच्या सामन्याने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीची सुरुवात केली. या युवा खेळाडूने पदार्पणाच्या सामन्यात नाबाद 100 धावा केल्या होत्या. त्याच्या बहरदार खेळीच्या जोरावर भारताने हा सामना 9 गडी राखून एकहाती जिंकला होता. या पदार्पणाच्या सामन्यात त्याला सामनावीराचा पुरस्कारही प्राप्त झाला होता. सध्याच्या घडीला तो संघाचा नियमित सदस्य बनला आहे.  

रॉबिन उथप्पा

Image

एकदिवसीय सामन्यातील पदार्पणात सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत रॉबिन उथप्पा दुसऱ्या स्थानावर आहे. 15 एप्रिल 2006 मध्ये इंदुरच्या मैदानात इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात उथप्पाला संधी मिळाली होती. या सामन्यात त्याने 86 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती. उथप्पाच्या कारकिर्दीतील ही सर्वोच्च धावसंख्या आहे. त्याच्या खेळीच्या जोरावर भारताने हा सामना 7 गडी राखून जिंकला होता. रॉबिन उथप्पाने भारताकडून आतापर्यंत 46 सामने खेळले आहेत. 2015 पासून तो भारतीय संघात स्थान मिळवण्यात अपयशी ठरला आहे. त्याच्या खात्यात एकदिवसीय सामन्यात 1031 धावा जमा आहेत. 

2011 वर्ल्डकपची फायनल फिक्स होती? श्रीलंकन सरकारने फाईल घेतली चौकशीला

ब्रजेश पटेल

या यादीत तिसऱ्या क्रमांकावर ज्या फलंदाजाने नाव कोरले आहे ते म्हणजे ब्रजेश पटेल. भारताकडून 21 कसोटी आणि 10 एकदिवसीय सामने खेळलेल्या ब्रजेश पटेल यांनी एकदिवसीय सामन्यात दमदार सुरुवात केली होती. 13 जूलै 1974 मध्ये इंग्लच्या लीड्स च्या मैदानात त्यांनी आपला पहिला सामना खेळला. या सामन्यात त्यांनी 82 धावांची लक्षवेधी खेळी केली होती. त्यांची ही अर्धशतकी खेळी भारताला पराभवापासून वाचवू शकली नव्हती. चांगली सुरुवात मिळून देखील त्यांना आपल्या कामगिरीत सातत्य राखता आले नाही. मोजके सामने खेळूनच त्यांच्यावर बाकावर बसण्याची वेळ आली. 


​ ​

संबंधित बातम्या