IPL : आयसीएलच्या फ्लॉपशोनंतर, लोकप्रिय झालेली क्रिकेट स्पर्धा

सुशांत जाधव
Wednesday, 29 July 2020

बीसीसीआयने स्पर्धेसाठी मैदाने नाकारुन आयोजकांचीच नव्हे तर दिग्गजांचीही कोंडी केल्याचा प्रकार यावेळी घडला होता.

यंदाच्या वर्षातील 13 हंगामातील आयपीएल स्पर्धा युएईच्या मैदानात रंगणार असल्याचे निश्चित झाले आहे. भारतीय मैदानात परदेशी गडी घेऊन सर्वात पहिल्यादा स्पर्धा रंगली ती म्हणजे इंडियन क्रिकेट लीग. झी समूहाचे सुभाष चंद्रा यांनी वेस्टइंडिजमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेनंतर इंडियन लीग स्पर्धा सुरु केली. या स्पर्धेत विंडीजचा दिग्गज ब्रायन लारा, पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हक, शेन बॉण्डसारखे खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेनंतरच  बीसीसीआयने इंडियन प्रिमियर लीगची स्थापना केली.आयसीएलचा आगाज हा 30 नोव्हेंबर 2008 रोजी चंदीगडजवळच्या पंचकूलामध्ये झाला. या स्पर्धेत स्टार क्रिकेटरचा भरणा होता मात्र बहुतांश खेळाडू हे माजी  क्रिकेटर असल्यामुळे कदाचित या स्पर्धेला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही.

#आठवतेय_का? : IPL मध्ये हिटमॅननं MI विरुद्धच केली होती हॅटट्रिकची कमाल!

बीसीसीआयने स्पर्धेसाठी मैदाने नाकारुन आयोजकांचीच नव्हे तर दिग्गजांचीही कोंडी केल्याचा प्रकार यावेळी घडला होता. कपिल देव यांच्यासह या स्पर्धेशी संबंधित असलेल्या खेळाडूंवर कारवाई करण्यापर्यंत वाद रंगला होता. याच वेळी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कसोटी मालिकाही रंगली होती. झटपट टी-20 च्या प्रारुपाकडे पाठ फिरवत क्रिकेट चाहते भारत-पाक कसोटीकडे वळल्याचे चित्र त्यावेळी पाहायला मिळाले होते. 1983 वर्ल्डकप विजेत्या संघाचे कर्णधार कपिल देव, मदनलाल, संदीप पाटील आणि बलविंदरसिंह संधू ही मंडळी देखील आयसीएल हंगामातील प्रमुख चेहरा होती. बीसीसीआयने स्पर्धेत खेळण्यासंदर्भात कठोर इशारा देऊनही दिनेश मोंगिया, अभिषेक झुनझुनवाला आणि अन्य युवा क्रिकेटपटूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. बीसीसीआयने त्यांच्यावर कारवाई देखील केल्याचे पाहायला मिळाले. अंबाती रायडूचाही यात समावेश होता.

ICC Test WC : पाकची धुलाई केली तरी भारताची बरोबरी करणं इंग्लंडला जमणार नाही​

या स्पर्धेतील अपयश आले असताना बीसीसीआयचा प्लॅन यशस्वी ठरल्याचे पाहायला मिळाली. इंडियन प्रिमियर लीगच्या स्वरुपात बीसीसीआयने विद्यमान भारतीय तसेच परदेशी खेळाडूंच्या सहभागाने नियोजनबद्द डाव आखत स्पर्धा यशस्वी करुन दाखवली. क्रिकेटच्या मैदानातील आयपीएलही एक लोकप्रिय स्पर्धा ठरली आहे. ऑस्ट्रेलियात रंगणारी आयसीसीची स्पर्धा स्थगित झाल्यानंतरही आयपीएलच्या आयोजनासाठी  ज्या पद्धतीने प्रयत्न झाले त्यावरुन आयपीएलची लोकप्रियता आणि बीसीसीआयची ताकद याचा अंदाजा येतो. 


​ ​

संबंधित बातम्या