Pro Kabaddi 2019 : गुजरातने उडवला यूपीचा धुव्वा 

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 26 July 2019

गतउपविजेत्या गुजरात संघाने यंदाही जोरदार सुरवात करून प्रो कबड्डीच्या सातव्या मोसमात दुसरा विजय मिळवला. कमकुवत यूपी योद्धाचा 44-19 असा धुव्वा उडवला. 

प्रो कबड्डी
हैदराबाद ः गतउपविजेत्या गुजरात संघाने यंदाही जोरदार सुरवात करून प्रो कबड्डीच्या सातव्या मोसमात दुसरा विजय मिळवला. कमकुवत यूपी योद्धाचा 44-19 असा धुव्वा उडवला. 

केवळ मोनू गोयत हा नावाजलेला खेळाडू असलेला; पण तोही अयपशी ठरत असल्यामुळे यूपी संघाची अवस्था बिकट झाली. प्रो कबड्डीच्या इतिहासात सर्वाधिक रक्कम मिळालेल्या मोनूला आज अवघे दोनच गुण मिळवता आले. रिशांक देवाडिगा या सामन्यातही खेळू शकला नाही; त्यामुळे यूपीचा संघ आक्रमणात फारच दुबळा ठरला. संपूर्ण सामन्यात त्यांना चढाईत 12 गुणच मिळवता आले. पकडीमध्ये त्याहूनही अवस्था वाईट झाली. अवघ्या पाच गुणांचीच कमाई करता आली. 

सुपर टेन करणारा रोहित गुलिया आणि सहा गुण मिळवणाऱ्या सचिन तन्वरने यूपीचा बचाव खिळखिळा केला. गुजरातने तीन लोण दिले. मध्यंतरानंतर 25-9 अशी मोठी आघाडी घेत त्यांनी विजय निश्‍चित केला होता. यूपी संघाचा हा सलग दुसरा पराभव आहे.

 


​ ​

संबंधित बातम्या