यंदाची आशिया चषक टी-20 स्पर्धा रद्द 

टीम ई-सकाळ
Thursday, 9 July 2020

यंदाच्या आशिया चषक टी-20 स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. त्यामुळे कोणत्याही स्थानिक स्पर्धेसाठी आशिया चषक स्पर्धा रद्द करण्यास आपली परवानगी नसल्याचे पाकिस्तानच्या बोर्डाने म्हणत, यंदाची आशिया चषक स्पर्धा सप्टेंबर किंवा ऑक्टोबर मध्ये श्रीलंका अथवा यूएई या देशांमध्ये घेण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे म्हटले होते.

कोरोनाच्या संकटामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) स्पर्धेच्या आयोजनाचा निर्णय, ऑस्ट्रेलिया मध्ये रंगणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या निश्चितीनंतरच घेण्यात येणार आहे. परंतु सध्याच्या स्थितीनुसार ही स्पर्धा होणे जवळपास अनिश्चित झाले आहे. त्यामुळेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयपीएल सामन्यांच्या आयोजनाची तयारी केली. आणि अशातच पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) यंदाची आशिया चषक टी-20 स्पर्धा वेळापत्रकाप्रमाणेच घेण्यात येणार असल्याचे म्हटले होते. त्यामुळे बीसीसीआय समोर वेगळीच समस्या निर्माण झाली होती. मात्र आता हा अडथळा दूर झाला असून, आशिया चषक टी-२० स्पर्धा रद्द करण्यात आली आहे.  

कोरोनामुळे आता आयटीटीएफने रद्द केल्या 'या' स्पर्धा   

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पुढे ढकलण्यात आलेली यंदाची आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धा रद्द करण्यात आल्यास, त्याठिकाणी बीसीसीआयने आयपीएल स्पर्धेचे आयोजन करण्याचे ठरवले आहे. पण त्यानंतर यंदाची आशिया चषक टी-20 स्पर्धा नियोजित वेळापत्रकानुसारच घेण्यात येणार असल्याचे पाकिस्तानच्या  क्रिकेट बोर्डाने म्हटले होते. त्यामुळे आयपीएलच्या सामन्यांना आशिया चषक टी-20 स्पर्धेमुळे अडथळा निर्माण झाला होता. परंतु आता कोरोनाच्या आजारामुळे आशिया चषक टी-20 स्पर्धा आयोजित करणे शक्य नसल्याचे आशियाई क्रिकेट परिषदेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. तसेच काल बुधवारी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी एका व्हिडिओ चॅटच्या दरम्यान आशिया चषक स्पर्धा रद्द करण्यात आल्याचे सांगितले होते. शिवाय पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष एहसान मणी यांनी देखील आशिया चषक टी-20 स्पर्धा रद्द करण्यात आली असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तान क्रिकेट मंडळातील अधिकाऱ्यांनी देखील सध्याच्या कोरोना काळामुळे आशिया चषक स्पर्धा पुढे ढकलण्यात येत असल्याचे  म्हटले आहे.  

ऐतिहासिक सामन्यापूर्वी क्रिकेटपटूंचे ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’ ला समर्थन  

दरम्यान, यंदाच्या आशिया चषक टी-20 स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. त्यामुळे कोणत्याही स्थानिक स्पर्धेसाठी आशिया चषक स्पर्धा रद्द करण्यास आपली परवानगी नसल्याचे पाकिस्तानच्या बोर्डाने म्हणत, यंदाची आशिया चषक स्पर्धा सप्टेंबर किंवा ऑक्टोबर मध्ये श्रीलंका अथवा यूएई या देशांमध्ये घेण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे म्हटले होते. याव्यतिरिक्त, आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला सुमारे 4 हजार कोटींचे नुकसान होऊ शकते. तर आयपीएलच्या संघ मालकांना देखील मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता असल्याचे, जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे बीसीसीआय कोणत्याही परिस्थितीत आयपीएलच्या सामन्यांचे आयोजन करण्याचा प्रयत्न करत आहे.         

 


​ ​

संबंधित बातम्या