17 वर्षांच्या पोरानं ठोकलंय द्विशतक; आता कसला पृथ्वी शॉ परत येतोय...

वृत्तसंस्था
Wednesday, 16 October 2019

सतरा वर्षीय मुंबईकर यशस्वी जैसवाल भारताच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये द्विशतक करणारा सर्वात लहान खेळाडू ठरला. त्याच्या या द्विशतकाच्या जोरावर साडेतिनशे धावा करणाऱ्या मुंबईने विजय हजारे राष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत झारखंडचा 38 धावांनी पराभव केला. 

बंगळुर : सतरा वर्षीय मुंबईकर यशस्वी जैसवाल भारताच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये द्विशतक करणारा सर्वात लहान खेळाडू ठरला. त्याच्या या द्विशतकाच्या जोरावर साडेतिनशे धावा करणाऱ्या मुंबईने विजय हजारे राष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत झारखंडचा 38 धावांनी पराभव केला. 

ICCच्या स्पर्धा जिंकून दाखव; गांगुलींचा विराटला इशारा

मुंबईकडून या अगोदर सचिन तेंडुलकहर, रोहित शर्मा (3) यांनी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात द्विशतके केलेली आहेत. दोन दिवसांपूर्वी केरळच्या संजू सॅमसननेही याच स्पर्धेत द्विशतकी खेळी केली होती, पण या सर्वांत यशस्वी जैसवाल सर्वात लहान फलंदाज ठरला. 

या स्पर्धेत जैसवालने केरळविरुद्ध शतकी खेळी केली होती. आज त्याने 154 चेंडूत 17 चौकार आणि 12 षटकारांसह 203 धावा फटकावल्या. ही खेळी सजवत असताना त्याने माजी आंतरराष्ट्रीय वेगवान गोलंदाज वरूण ऍरॉन भारतीय अ संघातून खेळलेल्या शादाब नदीम, 19 वर्षांखालील विश्‍वकरंडक विजेत्या संघातील अनुकुल रॉय या सर्व गोलंदाजांवर हल्ला चढवला. मुंबईचा माजी कर्णधार आदित्य तरेसह जैसवालने द्विशतकी सलामी दिली तेथेच मुंबईच्या मोठ्या धावसंखेचा पाया रचला गेला. 

जैसवालने त्यानंतर सिद्धेश लाडसह दुसऱ्या विकेटसाठी 105 धावांची भागीदारी केली. जैसवाल अखेरच्या षटकात बाद झाला. 

आता लवकरच होणार भारत-पाक सामना; बघा ICCचा प्लॅन

झारखंडचा प्रतिकार 

महेंद्रसिंग धोनी देशांतर्गत सामन्यात खेळत नसला तरी झारखंडचा संघ आता भक्कम झालेला आहे. इशान किशन, सौरव तिवारी आणि विराट सिंग असे तगडे फलंदाज आहेत. भले मोठे आव्हान असले तरी त्यांनी हार मानली नाही. इशान 34 धावांवर बाद झाल्यावर सौरव तिवारीने 77 धावा केल्या आणि विराट सिंगने विराट कोहलीस साजेशी अशी 77 चेंडूत 100 धावा फटकावल्या. अखेरच्या 36 चेंडूत 63 धावांची गरज होती, परंतु सिद्धेश लाडने अखेरचे फलंदाज बाद करून मुंबईला विजय मिळवून दिला. 

संक्षिप्त धावफलक : मुंबई : 50 षटकांत 3 बाद 358 (यशस्वी जैसवाल 203 -154 चेंडू, 17 चौकार, 12 षटकार, आदित्य तरे 78 -102 चेंडू, 6 चौकार, 1 षटकार, श्रेयस अय्यर 31 -14 चेंडू, 1 चौकार, 3 षटकार, विवेकानंद तिवारी 32-2) वि. वि. झारखंड ः 46.4 षटकांत 319 (इशान किशन 34 -34 चेंडू, 5 चौकार, 1 षटकार, सौरव तिवारी 77 -78 चेंडू, 5 चौकार, 4 षटकार, विराट सिंग 100 -77 चेंडू, 12 चौकार, 2 षटकार, धवल कुलकर्णी 37-5, शिवम दुबे 66-2, सिद्धेश लाड 32-2)


​ ​

संबंधित बातम्या