IPL 2020 : पाणीपुरी विकणाऱ्या तरुणाची 17व्या वर्षी आयपीएलमध्ये 'रॉयल' एन्ट्री

टीम ई-सकाळ
Friday, 20 December 2019

विजय हजारे करंडक स्पर्धेत डावखुरी फलंदाजी करताना त्याने सहा सामन्यात एक द्विशतक (झारखंड विरुद्ध) आणि एक अर्ध शतक झळकावले.

पूर्वी लोक म्हणायचे खेळून कोणाचं भलं झालं आहे..!! मात्र आता काळ बदलला आहे. खेळला नाही तर तुमचं भलं होणार नाही. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

खरंच तुम्हाला जर करोडपती व्हायचं असेल, तर तुम्हाला खेळाता आलं पाहिजे. तुम्ही जर खेळत असाल, तर नक्की करोडपती व्हाल. हवं तर विचारा यशस्वी जयस्वालला. तो अवघ्या 17व्या वर्षी करोडपती झाला आहे. 

- IPL 2020 : विराट आता हैदराबादच्या ताफ्यात; सनरायझर्सने मोजले 10 पट जास्त पैसे

भारतात क्रिकेटचं वेड प्रचंड आहे. आणि त्यात गुरुवारी (ता.19) इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच (आयपीएल)ने खेळाडूंचा लिलाव केला. त्यात मुंबईचा युवा खेळाडू यशस्वी जयस्वालला राजस्थान रॉयलने खरेदी केलं आहे.

- IPL 2020 : बेस प्राईज फक्त दोन कोटी अन् कमावले 15.50 कोटी, कोण पाहा

यशस्वी जयस्वाल हा मूळ मुंबईचा. पाणीपुरी विकून पैसे कमवायचा. आणि क्रिकेट खेळायचा. रात्र -दिवस कष्ट करून क्रिकेट खेळायची हौस भागवायचा. आता तो आपल्या राजस्थान रॉयल कडून खेळताना दिसणार आहे. राजस्थानने त्याच्यासाठी तब्बल 2 कोटी 40 लाख रुपये इतकी रॉयल बोली लावली आहे.

- IPL 2020 : पंजाबचा बॅटींग कोच झाला आता नवा कर्णधार पाहा!

कोण आहे हा?

यशस्वी जयस्वाल - वय १७ वर्ष
- सध्या भारतीय संघात निवड (१९ वर्षीय विश्वचषक)
स्पर्धा - विजय हजारे करंडक 
या स्पर्धेत डावखुरी फलंदाजी करताना त्याने सहा सामन्यात एक द्विशतक (झारखंड विरुद्ध) आणि एक अर्ध शतक झळकावले.
एकूण धावा - ५६४ धावा 
सरासरी - ११२.८०


​ ​

संबंधित बातम्या