पंत सावध रहा, तो दीड वर्षांनं परततोय

सकाळ वृत्तसेवा
Monday, 22 July 2019

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी या दौऱ्यासाठी उपलब्ध नसल्याने त्याच्या जगी एकदिवसीय आणि ट्वेंटी20 संघात यष्टीरक्षणाची जबाबदारी रिषभ पंतकडे देण्यात आली आहे. मात्र, कसोटी संघाच्या यष्टीरक्षणाची जबाबदारी पुन्हा वृद्धिमान साहाकडे सोपवण्यात आली आहे.

मुंबई : पांढऱ्या चेंडूवर म्हणजेच झटपट निकालाच्या प्रकारात नवोदितांना प्राधान्य देण्यावर तर लाल चेंडूच्या कसोटी क्रिकेटमध्ये अनुभवावर निवड समितीने विश्वास दाखवला आणि वेस्ट इंडीजच्या बहुचर्चित दौऱ्यासाठी संघ निवड केली. त्याचवेळी पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेच्या दृष्टीने कृती आरखडा तयार करण्यास या संघ निवडीपासून सुरुवात झाली आहे. अशातच कसोटी संघात एका खेळाडूला तब्बल दीड वर्षाने स्थान मिळाले आहे. 

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी या दौऱ्यासाठी उपलब्ध नसल्याने त्याच्या जगी एकदिवसीय आणि ट्वेंटी20 संघात यष्टीरक्षणाची जबाबदारी रिषभ पंतकडे देण्यात आली आहे. मात्र, कसोटी संघाच्या यष्टीरक्षणाची जबाबदारी पुन्हा वृद्धिमान साहाकडे सोपवण्यात आली आहे. तब्बल दीड वर्षांनी साहाने संघात पुनरागमन केले होते. दीड वर्षांपूर्वी साहाला दुखापत झाली होती. या दुखापतीमधून तो पूर्णपणे सावरला आहे. त्यामुळे आता त्याला भारताच्या कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे.

या संघात पंतला संधी देण्यात आली असली तरी कसोटी संघात साहालाच यष्टीरक्षक म्हणून पसंती दिली जाईल.

भारतीय संघ कसोटीसाठी :
विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, मयांक अगरवाल, के. एल. राहुल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रोहित शर्मा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, ईशांत शर्मा, मोहंमद शमी, जसप्रीत बुमरा, उमेश यादव

भारतीय संघ वनडेसाठी :
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, के. एल. राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, केदार जाधव, मोहंमद शमी, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, नवदीप सैनी.

भारतीय संघ टी-20साठी :
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, के. एल. राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), कृणाल पंड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, दीपक चहर, नवदीप सैनी.


​ ​

संबंधित बातम्या