अकोल्यातील राष्ट्रीय कुस्तीपटूची गळफास घेऊन आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
Friday, 10 May 2019

शुभम मोरेश्वर कडोळे या 26 वर्षीय राष्ट्रीय कुस्तीपटूने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरातील शिव मंदिराच्या पाठीमागे असलेल्या झाडाला एका गळफास घेऊन आत्महत्या केली.

अकोला : शुभम मोरेश्वर कडोळे या 26 वर्षीय राष्ट्रीय कुस्तीपटूने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरातील शिव मंदिराच्या पाठीमागे असलेल्या झाडाला एका गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (ता.९) सायंकाळी ७.३० वाजता उघडकीस आली.

याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून शुभमचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सर्वोपचारमध्ये पाठविला. त्याने राष्ट्रीय स्तरावर कुस्तीमध्ये चांगले यश संपादन केले आहे. तो संगणक अभियंता होता. गळफास घेतलेल्याची ही शहरातील एकाच दिवसातील दुसरी घटना आहे.

शुभमचे वडिल मोरेश्वर हे अकोल्यात कुस्ती संस्था चालवितात तर त्याची आई सुनीता कडोळे या राज्यातील पहिल्या महिला कुस्ती वस्ताद आहेत.


​ ​

संबंधित बातम्या