पुनियाने कोरोना विरोधात थोपटले दंड; देणार सहा महिन्याचे पगार

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 25 March 2020

बजरंग पुनिया हा 65 वजनी गटातील जगातील सर्वोत्कृष्ट पहिलवानांपैकी एक आहे, भारतात अद्यापतरी कुठल्याही खेळाडूकडून आर्थीक मदतीची घोषणा करण्यात आलेली नाही. पुनिया पहिला खेळाडू आहे जो कोरोनाशी चार हात करण्यासाठी आखाड्यात उतरला आहे.

भारताचा आघाडीची पैलवान बजरंग पुनिया कोरोना व्हायरस कोरोना व्हायरसशी लढा देण्याकरिता हरियाना सरकारची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. आशीयीयी खेळांमध्ये गोल्ड मेडल विजेत्या पुनियाने त्याची सहा महिन्यांची पगार हरियाना सरकारने उभारलेल्या कोरोना व्हायरस रिलीफ फंडसाठी दान करणार आहे. त्याने एका ट्विट द्वारे ही माहिती दिली आहे. 

पठाण बंधूंची कोरोना ग्रस्तांना मोठी मदत, दान केले 4000 मास्क

जगभरातील खेळाडू कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी, रुग्णांच्या इलाजासाठी आर्थिक णदत करत आहेत. यात भारतातीळ खेळाडू देखील मागे राहिले नाहीत. पुनियाने ट्विट केलं की, “ मी बजरंग पुनिया माझं सहा महिन्याचं वेतन हरियाणा कोरोना रिलीफ फंडसाठी दान करतो. जय हिंद जय भारत.” बंजरंग पुनिया भारतीय़ रेल्वेत स्पेशल ड्यूटी ऑफिसर म्हणून नोकरी करतो.

बजरंग पुनिया हा 65 वजनी गटातील जगातील सर्वोत्कृष्ट पहिलवानांपैकी एक आहे, भारतात अद्यापतरी कुठल्याही खेळाडूकडून आर्थीक मदतीची घोषणा करण्यात आलेली नाही. पुनिया पहिला खेळाडू आहे जो कोरोनाशी चार हात करण्यासाठी आखाड्यात उतरला आहे. सोशल मिडीयामध्ये पुनियाची लोक मोठ्या प्रमाणात स्तुती करत आहेत. अनेकांनी ट्विट करत पुनियाने घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्याचे आभार मानले आहेत. केंद्रीय क्रिडा मंत्री किरन रिजजू यांना देखील ट्विट करत पुनिया यांची प्रशंसा केली.

कोरोनाशी लढण्यासाठी अश्विनने ट्विटरवर बदलले नाव

कोरोना व्हायरसचा खेळाडू तसेच क्रिडाप्रेमींना असलेला धोका लक्षात घेऊन जगभरातील क्रिडा स्पर्धा पुढे ढकलण्यात येत आहेत. काही दिवसांमध्ये होणारी आयपीएल स्पर्धा देखील रद्द होण्याची शक्यता आहे. त्याबरोबरच प्रतिष्ठेची आसणारी टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धा देखील   24जूलै 2020 मध्ये नियोजित होती, ती देखील आता पुढच्या वर्षात ढकलण्यात आली आहे. 
 


​ ​

संबंधित बातम्या