'धाकड गर्ल' आता करणार भाजपमध्ये 'दंगल'

वृत्तसंस्था
Monday, 12 August 2019

भारताची धाकड गर्ल बबिता फोगट आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. दिल्लीतील हरियाणा भवनमध्ये हा कार्यक्रम होईल, अशी माहिती तिचे वडिल आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते महावीर फोगट यांनी दिली. 

नवी दिल्ली : भारताची धाकड गर्ल बबिता फोगट आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. दिल्लीतील हरियाणा भवनमध्ये हा कार्यक्रम होईल, अशी माहिती तिचे वडिल आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते महावीर फोगट यांनी दिली. 

''भाजप सरकारने काश्मिरमधून कलम 370 हटवून खीप चांगली कामगिरी केली आहे. हरियाणाचे मुख्मंत्री मनोहर लाल यांनी अत्यंत पारदर्शक सरकार उभे केले असून त्यांनी राज्यातील तरुणांना चांगल्या संधी दिल्या आहेत,'' अशा शब्दांत महावीर यांनी भाजप सरकारचे कौतुक केले. 

बबिताने हरियाणा पोलिस विभागातून राजीनामा दिला आहे. बबिताने 2010 मध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य तर 2014 आणि 2018 मध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक पटकाविले आहे. 

संबंधित बातम्या