सेहवागसारखी फटकेबाजी करायला आवडले असते, पण..द्रविड यांच्या मनातीलं गोष्ट

टीम ई-सकाळ
Tuesday, 9 June 2020

राहुल द्रविड यांनी क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात आपला ठसा उमटवला. आयपीएलमधील झटपट क्रिकेटच्या मैदानात उतरुन त्यांनी आपल्या भात्यात चेंडूपेक्षा अधिक धावा करण्याची क्षमता असल्याचेही त्याने दाखवून दिले आहे.

मुंबई :भारतीय संघाची भिंत अशी ज्याची ख्याती आहे त्या मिस्टर रिलायबल राहुल द्रविड यांनी आपल्या संयमी खेळीनं अनेक वेळा भारतीय संघाला संकटातून बाहेर काढले. संथ फलंदाजीमुळे अनेकदा त्यांच्यावर टिकाही झाली. पण याचा आपल्या खेळीवर कोणताही परिणाम न होऊ देता राहुल द्रविड यांनी क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात आपला ठसा उमटवला. आयपीएलमधील झटपट क्रिकेटच्या मैदानात उतरुन त्यांनी आपल्या भात्यात चेंडूपेक्षा अधिक धावा करण्याची क्षमता असल्याचेही त्याने दाखवून दिले आहे. मात्र द्रविड यांना क्रिकेट चाहता आजही संयमी आणि उत्तमरित्या ग्राउंड शॉट्स  खेळणारा क्रिकेटर म्हणूनच ओळखतो. त्यांना कधी उंत्तुग फटकेबाजी करावी वाटली नसेल का? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना कधी काळी पडलाही असेल किंवा आजही पडत असेल. यावर खुद्द द्रविड यांनीच भाष्य केले आहे. 

#वर्णभेदाचा_खेळ : तिच्या उदरातील बाळावरही झाली होती विकृत टिपण्णी

बदलत्या क्रिकेटमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी नवे मापदंड सेट केले आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत माझी तुलनाच होऊ शकत नाही, असे राहुल द्रविड यांनी म्हटले आहे. सध्याचा जमाना उत्तुंग फटकेबाजीचा असला तरी पुजारासारख्या फलंदाजाची संघाला नेहमी गरज भासेल, या गोष्टीवरही त्यांनी भर दिला. क्रिकेट कितीही बदलले तरी तंत्रशूद्ध बचावात्मक शैलीचे अस्तित्व कधीच संपणार नाही, असे राहुल द्रविड यांनी म्हटले आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या कार्यक्रमात राहुल द्रविड यांनी माजी भारतीय क्रिकेटर संजय मांजरेकर यांच्यासोबत त्यांच्या काळातील क्रिकेट आणि सध्याच्या घडीला क्रिकेटमध्ये होणाऱ्या बदलावर भाष्य केले.  

 '...तर BCCI ला IPL स्पर्धा घेण्याचा अधिकार'

स्वत:च्या संयमी आणि बचावात्मक खेळ शैलीबद्दल ते म्हणाले की, मला संथ खेळणारा खेळाडू म्हटले तर वाईट वाटत नाही. पहिल्यापासूनच मी कसोटी खेळण्यावर लक्ष्य केंद्रीत केले होते. मैदानात तग धरुन राहणे, प्रतिस्पर्धी गोलंदाजांना दमवणं आणि नव्या चेंडूची चमक कमी करणे ही माझी जबाबदारी होती. ती जबाबदारी पार पाडण्याचा मी प्रयत्न करायचो. माझ्या फलंदाजी शैलीचा मला अभिमान आहे. मला सेहवागसारखी फटकेबाजी करता येत नव्हती किंवा करायची नव्हती असे नाही. पण माझी क्षमता वेगळी होती. एकाग्रता हे माझ्या खेळाचे वैशिष्ट्ये होते. मी त्याप्रमाणेच खेळण्यावर भर दिला, असेही द्रविड यांनी सांगितले.  

'चेंडू चमकवण्यासाठी कृत्रिम पदार्थ वापरण्याऐवजी हा प्रयोग करता येईल'

द्रविड पुढे म्हणाले की, भारताकडून मी 300 हून अधिक एकदिवसीय सामन्यात मैदानात उतरलो. त्यामुळे विकेट टिकून राहणे एवढीच माझी भूमिका नव्हती हे सिद्ध होते. पूर्वीच्या तुलनेत आज क्रिकेट खूप बदलले आहे. आताच्या घडीला माझा निभाव लागला नसता, असेही द्रविड यांनी यावेळी सांगितले. क्रिकेट हा मोठ्या धावसंख्येचा खेळ बनलाय. परंतु बचावात्मक खेळ शैलीतून तुम्ही क्रिकेटमधील सर्वश्रेष्ठ प्रकारात म्हणजेच कसोटीत मुश्किल परिस्थितीतून संघाला बाहेर काढू शकता. आमच्या काळात क्रिकेटमध्ये कारकिर्दी सुरु करण्यासाठी कसोटी क्रिकेट होणं आवश्यक होते. आता ती परिस्थिती राहिलेली नाही. आज तुम्ही तंत्रशुद्ध बचावात्मक शैलीशिवाय टी-20 आणि वनडे संघात स्थान मिळवून कामगिरीच्या जोरावर संघातील स्थान कायम ठेवू शकता, असेही द्रविड यांनी म्हटले आहे.


​ ​

संबंधित बातम्या