इटलीला हरवित भारत उपांत्यपूर्व फेरीत

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 1 August 2018

लंडन - भारताने विश्वकरंडक महिला हॉकी स्पर्धेत इटलीला ३-० असे हरवित उपांत्यपूर्व फेरीत मुसंडी मारली. सुरवातीलाच पेनल्टी कॉर्नर दवडल्यानंतर भारताकडे मध्यंतरास एकाच गोलची आघाडी होती; पण त्यानंतर भारताने दोन गोल केले. या दणदणीत विजयामुळे भारताचे मनोधैर्य उंचावले आहे.

नवव्या मिनिटाला लालरेमसियामीने मैदानी गोलवर खाते उघडले. त्यानंतर दोन गोल पेनल्टी कॉर्नरवर झाले. नेहा गोयलने ४५व्या, तर वंदना कटारियाने ५५व्या मिनिटाला लक्ष्य साधले. भारताला आणखी मोठा विजय मिळविता आला असता; पण वंदना आणि नवज्योत कौरने अंतिम टप्प्यात संधी दवडली.

१९७८ च्या स्पर्धेत भारत सातवा होता. त्यानंतर भारताने प्रथमच आठ संघांमध्ये स्थान मिळविले. भारताची दोन ऑगस्ट रोजी आयर्लंडशी लढत होईल.

सामन्यातील पहिला पेनल्टी कॉर्नर भारताने मिळविला, पण गुरजीत कौरने स्वैर फटका मारला. त्यानंतर चेंडूवरील ताब्यासाठी बरीच चुरस झाली. त्यात इटलीच्या बचावपटूंचा गराडा असूनही लालरेमसियामीने प्रतिस्पर्धी गोलरक्षिकेच्या डोक्‍यावरून चेंडू नेटमध्ये मारला. यामुळे इटलीवरील दडपण वाढले. पूर्वार्धात भारताने एका गोलची आघाडी राखली. दुसऱ्या सत्रात दोन्ही संघांचा खेळ ढिसाळ झाला. यात उदिता केवळ गोलरक्षिकेचा अडथळा असताना ढिलाईमुळे चेंडूवर ताबाच मिळवू शकली नाही. मध्यंतरास भारताची आघाडी कायम राहिली.

तिसऱ्या सत्रात भारताने पाठोपाठ दोन संधी मिळविल्या; पण दोन्ही वेळा नवनीत कौर चकली. याच सत्रात राणीने मध्य क्षेत्रातून मुसंडी मारली; पण निर्णायक आगेकूच करण्यापूर्वीच तिने चेंडूवरील ताबा गमावला.

संबंधित बातम्या