टीम इंडिया सावध व्हा ! इंग्लंड पाठलाग करतोय, पण कशात

सुशांत जाधव
Sunday, 9 August 2020

या सलग तिसऱ्या कसोटी विजयाने इंग्लंडने तिसऱ्या स्थान भक्कम करताना भारत आणि दुसऱ्या स्थानावर असलेले ऑस्ट्रेलिया यांच्यातील गुणांचा फरक कमी केला आहे.

दुबई : अगोदर वेस्ट इंडीजविरुद्ध सलग दोन आणि काल पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवून सलग तीन कसोटी सामने जिंकणाऱ्या इंग्लंडने  कसोटी क्रिकेट अजिंक्य स्पर्धेत आघाडीवर असलेल्या भारतासमोर आव्हान उभे केले आहे. पहिल्या डावात शतकी पिछाडी असतानाही आणि २७७ धावांच्या आव्हानासमोर पहिले पाच फलंदाज बाद झाल्यावरही इंग्लंडने पाकिस्तानविरुद्धचा पहिला कसोटी सामना चौथ्याच दिवशी जिंकला.

CPL2020 : कॅरेबियन लीगमध्ये धावांची 'बरसात' करणारे आघाडीचे 5 फलंदाज!

या सलग तिसऱ्या कसोटी विजयाने इंग्लंडने तिसऱ्या स्थान भक्कम करताना भारत आणि दुसऱ्या स्थानावर असलेले ऑस्ट्रेलिया यांच्यातील गुणांचा फरक कमी केला आहे. इंग्लंडचे (13 सामने) 266 गुण झाले आहेत तर भारताचे नऊ सामन्यातू 360 आणि ऑस्ट्रेलियाचे 10 सामन्यातून 266 गुण आहेत. इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात तीन कसोटी सामन्यांची मालिका होत आहे. आता दुसरा कसोटी सामना इंग्लंडने जिंकला तर ते ऑस्ट्रेलियाला मागे टाकून दुसरा क्रमांक मिळवू शकतील.

कशी आहे आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप प्वॉइंट्स सिस्टम

मालिकेच स्वरुप विजयी संघास मिळाणारे गुण सामना बरोबरीत सुटल्यास मिळणारे गुण सामना अनिर्णित झाल्यास दिले जाणारे गुण
दोन सामन्यांची मालिका  60 30 20
तीन सामन्यांची मालिका  40 20 13
चार सामन्यांची मालिका 30 15 10
पाच सामन्यांची मालिका 24 12 8

 


​ ​

संबंधित बातम्या