World Cup Semi Finals : भारतvsन्यूझीलंड, ऑस्ट्रेलियाvsइंग्लंड

वृत्तसंस्था
Sunday, 7 July 2019

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीची लढत 9 जुलैला मँचेस्टरच्या मैदानावर होणार आहे. तर, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील सामना 11 जुलैला बर्मिंगहॅम येथे होणार आहे. विश्वकरंडक स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (14 जुलैला) होणार आहे.

लंडन : विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीचे चित्र स्पष्ट झाले असून, भारताची लढत न्यूझीलंडबरोबर तर ऑस्ट्रेलियाचा सामना यजमान इंग्लंडसोबत होणार आहे.

शनिवारी भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या सामन्यात भारताने विजय मिळवून 2 गुण मिळविल्याने भारताचे 15 गुण झाले आहेत. तर, दुसरी ऑस्ट्रेलियाला दक्षिण आफ्रिकेकडून 10 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे त्यांचे 14 गुण राहिले. या पराभवामुळे ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर राहिल्याने ऑस्ट्रेलियाची लढत तिसऱ्या स्थानावर असलेल्या इंग्लंडसोबत होणार आहे. तर, भारत चौथ्या स्थानावर असलेल्या न्यूझीलंडविरुद्ध लढणार आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीची लढत 9 जुलैला मँचेस्टरच्या मैदानावर होणार आहे. तर, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील सामना 11 जुलैला बर्मिंगहॅम येथे होणार आहे. विश्वकरंडक स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (14 जुलैला) होणार आहे.

​ ​

संबंधित बातम्या