अंतिम लढत दृष्टिक्षेपात

वृत्तसंस्था
Monday, 16 July 2018

लक्षवेधक 
- मारिओ मॅंदझुकिच हा विश्‍वकरंडकाच्या अंतिम लढतीत स्वयंगोल करणारा पहिला खेळाडू. 
- एन गॉलो कॉंते आणि पॉल पोग्बा हे दोघेही संघात असताना फ्रान्स यापूर्वीच्या 18 लढतींत अपराजित (14 विजय, 4 बरोबरी). 
- चॅंपियन लीग आणि विश्‍वकरंडकाची अंतिम लढत एकाच वर्षी खेळलेला रॅफेल वॅराने हा पाचवा फ्रान्स खेळाडू. 
- किलान एम्बापे (19 वर्षे 207 दिवस) हा विश्‍वकरंडकाची अंतिम लढत खेळणारा तिसरा सर्वांत लहान खेळाडू. यापूर्वी पेले (1958- 17 वर्षे 249 दिवस) आणि गिउस्पे बेर्गोमी (1982- 18 वर्षे 201 दिवस). 

- अंतिम लढतीत गोल करणारा एम्बापे हा दुसरा सर्वांत लहान खेळाडू. 
- अंतिम लढतीपूर्वी फ्रान्स या स्पर्धेत केवळ 9 मिनिटे 12 सेकंद पिछाडीवर होते, तर क्रोएशिया बाद फेरीच्या सर्व लढतीत. 
- इवान पेरिसीच याचा प्रमुख स्पर्धेतील 11 गोलांत (7 गोल, 4 साह्य) सहभाग, डेव्हॉर सुकरला (10) मागे टाकले. 
- अँतॉईन ग्रिजमन याचे मुख्य स्पर्धेतील बाद फेरीत बारा गोल. गेल्या पन्नास वर्षांतील फ्रान्सकडून ही सर्वोत्तम कामगिरी. 
- ग्रिजमनने गोल केलेल्या लढतीत फ्रान्स अपराजित. 
- ग्रिजमनच्या गोलपूर्वी फ्रान्सचा गोलपोस्टच्या दिशेने एकही शॉट्‌स नव्हता. 
- ग्रिजमनची पेनल्टी किक ही स्पर्धा इतिहासातील अंतिम सामन्यातील पाचवी, पाचही किकवर गोल, यापूर्वीही या प्रकारचा गोल फ्रान्सचाच. 2006 च्या स्पर्धेत झिनेदीन झिदानकडून इटलीविरुद्ध. 
- 1974 च्या स्पर्धेतील अंतिम लढतीनंतर प्रथमच फायनलमध्ये पूर्वार्धात तीन गोल (पश्‍चिम जर्मनी 2 वि. नेदरलॅंड्‌स 1). 
- पिछाडीनंतर अंतिम लढत जिंकण्याचा पराक्रम केवळ उरुग्वेकडून. 1930 च्या स्पर्धेत त्या वेळी अर्जेंटिनाविरुद्ध विजय. 
- युरोप तसेच विश्‍वकरंडकाच्या अंतिम लढतीत गोल करणारा मॅंदझुकिच हा केवळ पाचवा खेळाडू. 
- एकाच लढतीत गोल आणि स्वयंगोल हे दोन्ही घडवणारा मॅंदझुकिच हा स्पर्धा इतिहासातील केवळ दुसरा खेळाडू. यापूर्वी नेदरलॅंड्‌सचा एर्मी बॅंडिट्‌स (वि. इटली 1978). 
 
​ ​

संबंधित बातम्या