2011 वर्ल्डकप फिक्सिंग आरोपाचा बार फुसका: श्रीलंकेनेच घेतले आरोप मागे

टीम ई-सकाळ
Friday, 3 July 2020

त्या सामन्यात खेळलेल्या काही प्रमुख खेळाडूंचा जबाब आम्ही नोंदवला, परंतु आरोप सिद्ध होण्यासाठी कोणतेही पुरावे मिळाले नाहीत, त्यामुळे पुढील चौकशी बंद करत आहोत असे चौकशी विभागाचे प्रमुख जगथ फोंसेका यांनी सांगितले.

कोलंबो : कोणत्याही पुराव्या अभावी 2011 च्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामना फिक्स केल्याच्या आरोपानंतर सुरू केलेल्या चौकशीचा बार फुसका ठरला परिणामी चौकशी बंद करण्याचा निर्णय श्रीलंका क्रिकेट मंडळाने घेतला आहे. मुंबईत वानखेडे स्टेडियवर 2011 मध्ये झालेला विश्वकरंडक अंतिम सामना फिक्स होता असा आरोप श्रीलकेच्या तत्कालिन क्रीडामंत्र्यांनी नऊ वर्षानंतर हल्लीच केला होता.श्रीलंका क्रीडा खात्याच्या विशेष चौकशी पथाने विनापुराव्याच्या या आरोपाची चौकशी सुरू केली होती. ही चौकशी आज संपली. त्या सामन्यात खेळलेल्या काही प्रमुख खेळाडूंचा जबाब आम्ही नोंदवला, परंतु आरोप सिद्ध होण्यासाठी कोणतेही पुरावे मिळाले नाहीत, त्यामुळे पुढील चौकशी बंद करत आहोत असे चौकशी विभागाचे प्रमुख जगथ फोंसेका यांनी सांगितले.

क्रिकेटची रंगीत तालीम सुरू; सराव सामन्यात नियमांची काटेकोर अंमलबजावणी 

आम्ही तीन जबाब नोंदवले, परंतु कोणतेही पुरावे मिळाले नाहीत. माजी क्रीडा मंत्री महिंदानंदा अलुतगमांगे यांनी तब्बल 14 आरोप लावले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनेही (आयसीसी) या आरोपांची दखल घेतली नाही इतकेच नव्हे तर तर त्यांनीही कोणत्याही चौकशीची मागणी केली नाही, असे फोंसेका म्हणाले. या प्रकरणात चौकशी समितीने गेल्या काही दिवसांत तत्कालिन कर्णधार कुमार संगकारा, माहेला जयवर्धने, उपल थरांगा, निवड समितीचे तत्कालिन अध्यक्ष अरविंद डिसिल्वा यांचा जबाब नोंदवला होता. नऊ वर्षानंतर जाग आलेले श्रीलंकेचे तत्कालिन क्रीडामंत्री अलतुगमांगे यांनी अंतिम सामन्याबाबत आरोप केले असले तरी कोणाचे नाव घेतले नव्हते आथवा कोणताही पुरावा दिला नव्हता.

IPL आयोजनच्या शर्यतीत 2 परदेशी; जर-तरच्या समीकरणात कोण मारणार बाजी?


​ ​

संबंधित बातम्या