1983 वर्ल्ड कप फायनलमध्ये पोहचल्यावर खेळाडूंना किती बोनस मिळाला होता माहितेय का?

टीम ई-सकाळ
Thursday, 25 June 2020

कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने सेमीफायनलमध्ये धडक मारल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानावर भारतीय संघ चमत्कार करेल, अशी अपेक्षा त्यावेळी कोणची केली नव्हती. 

क्रिकेटच्या मैदानात निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या वेस्ट इंडिज संघाला रोखून भारतीय संघाने 1983 मध्ये पहिला विश्वचषक जिंकला. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची ही ऐतिहासिक कामगिरी अविस्मरणीय अशीच आहे. 1975 आणि 1979 मध्ये विश्वचषकावर नाव कोरणारा  वेस्ट इंडिज स्पर्धेतील प्रबळ दावेदार होता. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या संघात वेस्ट इंडिजला भिडण्याची ताकद होती. पण भारत वेस्ट इंडिजला पराभूत करेल, अशी अपेक्षा त्यावेळी कोणीच केली नव्हती. कोणीही अपेक्षा नसणाऱ्या भारतीय संघाने उपांत्य फेरीत इंग्लंडला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत करत फायनलमध्ये प्रेवश केला. भारतीय संघाने फायनलमध्ये प्रवेश केल्यानंतर तत्कालीन भारतीय क्रिकेट मंडळाने संघाला 25000 रुपयांचा बोनस देण्याची घोषणा केली.

आता भारतीय क्रिकेट संघातील या खेळाडूने सुरु केले सराव

या संघाचे सदस्य असलेल्या के श्रीकांत यांनी 37 वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक विजयाच्या आठवणींना उजाळा दिलाय. यावेळी त्यांनी विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या बैठकीची आठवणही सांगितली. ते म्हणाले की, अंतिम सामन्याच्या पूर्वसंध्येला भारतीय क्रिकेट बोर्डाचे वरिष्ठ अधिकारी, संयुक्त सचिव यांनी एक छोटी बैठक बोलावली होती. यावेळी संघातील सर्व सदस्य उपस्थितीत होते. उद्याच्या सामन्यात काय होईल याची चिंता करु नका, असे सांगत बोर्डाकडून संघाला इथपर्यंतच्या खास प्रवासाबद्दल 25000 देण्याची घोषणा करण्यात आली होती, असे के श्रीकांत यांनी सांगितली. त्याकाळात क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि अन्य देशांतील संघाचा दबदबा होता. त्यामुळे आमचा फायनलमधील प्रवेश ही मोठी गोष्ट होती, असेही ते म्हणाले.

#क्रिकेट_डायरी : या पाच भारतीय फलंदाजांनी पहिल्या ODI शतकासाठी खूप वेळ घेतला! 

पहिल्या सेमीफायनलमध्ये यशपाल शर्मा अन् संदीप पाटील यांच अर्धशतक 

कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने सेमीफायनलमध्ये धडक मारल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानावर भारतीय संघ चमत्कार करेल, अशी अपेक्षा त्यावेळी कोणची केली नव्हती. घरच्या मैदानावर चाहत्यांचा मिळणारा प्रतिसाद भारताला आणखी दबाव निर्माण करणारा असाच होता. इंग्लंडने या सामन्यात प्रथम फंलदाजी करत निर्धारित 60 षटकात 213 धाव केल्या होत्या. यशपाल शर्मा (61) संदीप पाटील (51) या दोघांची अर्धशके आणि मोहिंदर अमरनाथ यांनी केलेली 46 धावांची महत्त्वपूर्ण खेळी याच्या जोरावर भारतीय संघाने 32 चेंडू आणि 6 गडी राखून सामना जिंकत ऐतिहासिक विजयाच्या दिशेने वाटचाल केली होती.


​ ​

संबंधित बातम्या