जगज्जेतीस हरवून सिंधू उपांत्य फेरीत 

वृत्तसंस्था
Friday, 3 August 2018

नानजिंग/मुंबई : गतवर्षी पी. व्ही. सिंधू नोझोमी ओकुहाराविरुद्ध जागतिक स्पर्धेच्या अंतिम लढतीत पराजित झाली होती. एका वर्षाने सिंधूने याचे उट्टे काढताना दोन गेममध्येच विजय मिळविला. या विजयामुळे पदक निश्‍चित केलेल्या सिंधूवरच भारताच्या आशा आहेत. साईना नेहवाल तसेच साई प्रणीतचे आव्हान आटोपले आहे. 

सिंधूने मोक्‍याच्या वेळी खेळ उंचावत जगज्जेत्या ओकुहाराला 21-17, 21-19 असे हरवले. ओकुहाराने सुरवातीस सिंधूच्या तोडीस तोड खेळ केला. त्यानंतरही ओकुहाराने तिच्या पारंपरिक प्रतिस्पर्धीस क्वचितच पूर्ण वर्चस्व दिले; पण सिंधूने शांतपणे खेळ करीत आपली आघाडी क्वचितच गमावली. दुसऱ्या गेममध्ये सुरवातीस सिंधूने 0-5 पिछाडीनंतर आघाडी घेतली; पण ब्रेकला ओकुहारा 11-8 आघाडीवर होती. सिंधूने 16-16 बरोबरी साधली. अंतिम टप्प्यात खेळ उंचावत सिंधूने बाजी मारली. 

साई प्रणीत कंतो मोमोताविरुद्ध 12-21, 12-21 असा पराजित झाला.

संबंधित बातम्या