मध्यम पल्ल्याची धावपटू दिबाबाची जागतिक स्पर्धेतून माघार

वृत्तसंस्था
Thursday, 19 September 2019

-इथियाेपियाची मध्यम पल्ल्याची धावपटू गेन्झेबे दिबाबा हिची टाचेच्या दुखापतीमुळे जागतिक मैदानी स्पर्धेतून माघार

-गेल्या 2015 मधील जागितक स्पर्धेत तिने सुवर्णपदक पटकावले होते.

-1500 मीटर शर्यतीमधील 3 मिनिट 50.07 सेकंदाचा विश्‍वविक्रमही दिबाबाच्या नावावर

-दिबाबाच्या गैरहजेरीत आता नेदरलॅंडची सिफान हसन ही दुसरी वेगवान महिला धावपटू जागतिक स्पर्धेत संभाव्य विजेती

पॅरिस ः मध्यम पल्ल्याची माजी विश्‍वविजेती धावपटू गेन्झेबे दिबाबा हिने दोहा येथे होणाऱ्या जागतिक मैदानी स्पर्धेतून माघार घेतली आहे. मध्यम पल्ल्याच्या 1500 मीटर धावण्याच्या शर्यतीत विशविक्रमी कामगिरी करणाऱ्या दिबाबा दिने पायाच्या दुखापतीमुळे माघार घेतल्याचे गुरुवारी जाहीर केले. 
इथियोपियाची 28 वर्षीय धावपटू हिने 2015 मध्ये बीजिंग येथील जागतिक स्पर्धेत या स्पर्धा प्रकारात विजेतेपद मिळविले होते. त्याचवर्षी तिने 3 मिनिट 50.07 सेकंदाचा विश्‍वविक्रमही आपल्या नावावर नोंदला होता. तिच्या उजव्या पायाच्या टाचेचा स्नायू दुखावला आहे. झ्युरिच येथे गेल्या महिन्यात झालेल्या डायमंड ीग स्पर्धेत तिला ही दुखापत झाली होती. 
दिबाबाने आपल्या माघारीची माहिती इन्स्टाग्रामवरून दिली. "ट्रॅकवर पुनरागमन करण्यासाठी आपण आतापासून सुरवात करत आहोत. पण, दुर्दैवाने आपण जागतिक स्पर्धेत सहभागी होऊ शकत नाही, याचे आपल्याला वाईट वाटते.' असे तिने म्हटले आहे. 
ही स्पर्धा 27 सप्टेंबरपासून दोहा येथे सुरू होणार आहे. दिबाबाच्या गैरहजेरीत आता नेदरलॅंडची सिफान हसन ही दुसरी वेगवान महिला धावपटू जागतिक स्पर्धेत वर्चस्व राखेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तिलाच आता संभाव्य विजेती म्हणून मानले जाईल यात शंका नाही. सिफा हसन हिची या स्पर्धा प्रकारातील 3 मिनिट 55.93 सेकंद ही वैयक्तिक सर्वोत्तम वेळ आहे. याचवर्षी मोनॅको येथील स्पर्धेत तिने ही वेळ नोंदविली होती. गेल्या स्पर्धेत सिफा ही या स्पर्धा प्रकारातील ब्रॉंझपदक विजेती आहे. त्याचबरोबर 2016 मध्ये पोर्टलॅंड येथे झालेल्या जागतिक इनडोअर मैदानी स्पर्धेत तिने सुवर्णपदक मिळविले आहे.


​ ​

संबंधित बातम्या