'सुन्या सुन्या मैफली'त रंग भरण्यास भारतीय क्रिकेट सज्ज; पण...

टीम ई-सकाळ
Tuesday, 2 June 2020

जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाच्या संकटातून सावरुन अन्य देशात खेळ स्पर्धेच्या आयोजनाची तयारी सुरु असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. भारतातही याच दिशेने वाटचाल सुरु असून क्रिकेटच्या सुन्या सुन्या मैफलीतून बाहेर पडत स्पर्धा पुन्हा सुरु करण्यास बीसीसीआय उत्सुक आहे. 

मुंबई : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे खेळाची मैदाने ओस पडली आहे. इतर खेळासह देशीतील लोकप्रिय असलेल्या क्रिकेट स्पर्धाही संकटात सापडल्या आहेत. कोरोनामुळे उत्सुकता लागून राहिलेल्या आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याची नामुष्की बीसीसीआयवर ओढावली आहे. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाच्या संकटातून सावरुन अन्य देशात खेळ स्पर्धेच्या आयोजनाची तयारी सुरु असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. भारतातही याच दिशेने वाटचाल सुरु असून क्रिकेटच्या सुन्या सुन्या मैफलीतून बाहेर पडत स्पर्धा पुन्हा सुरु करण्यास बीसीसीआय उत्सुक आहे. 

खेलरत्न पुरस्कार नामांकन मिळाल्यावर हिटमॅन रोहितनं दिली अशी प्रतिक्रिया

बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अरुण धूमल यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमी सराव शिबिराचे आयोजन करण्याच्या कामाला लागल्याचे त्यांनी म्हटले आहे. पण सराव शिबीराच्या तारखावर भाष्य करणे मात्र त्यांनी टाळले. सध्याच्या घडीला सरावासाठी वेळापत्रक निश्चित करणे शक्य नाही, असेही ते म्हणाले.  देशात कोरोना विषाणूने अक्षरश: थैमान घातले आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 2 लाखांच्या घरात पोहचला आहे. कोरोनाजन्य परिस्थितीमुळे क्रिकेटच्या स्पर्धा अडचणीत सापडल्या आहेत. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 3 सामन्यांची मालिकेदरम्यानच देशात कोरोनाची लाट आली. परिणामी दक्षिण आफ्रिकेच्या संघाला मालिका न खेळताच माघारी मायदेशी परतावे लागले होते.  

संगकारा म्हणाला, गोंधळ धोनीमुळे झाला नव्हता तर...

दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा रद्द झाल्यानंतर बहुप्रतिक्षित आयपीएल स्पर्धाही अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याची नामुष्की बीसीसीआयवर ओढावली. यंदाच्या हंगामातील स्पर्धा होणार की नाही याबाबत अद्यापही संभ्रमाचे वातावरण आहे. जूनच्या पहिल्या तारखेपासून खेळ क्षेत्रातील स्पर्धा पुन्हा सुरु होण्याची उमेद जागत आहे.

या स्पर्धेनं याठिकाणी रंगणार 'फॉर्म्युला वन रेस'चा थरार, पण...

यावर अरुण धूमल म्हणाले की,  'राष्ट्रीय शिबिर आयोजन करण्याबाबत हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. वेगवेगळ्या राज्यातील मार्गदर्शक सूचनेनुसार यावर विचार सुरु असून लवकरच भारतीय क्रिकेटच्या मैदानातील सामसूम नाहीसी होईल. स्थिती पूर्ववत होण्याची सुरुवात नेमकी कधी होईल हे सांगणे कठिण असल्याचेही त्यांनी सांगितले.  भारतीय संघातील खेळाडू हे वेगवेगळ्या राज्यातील आहेत. ते आपापल्या राज्यातील संघटनांशी चर्चा करुन राखून सराव सुरु करु शकतात, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.  
 


​ ​

संबंधित बातम्या