Womens T20 Challenge : महिलांची 'मिनी आयपीएल'ही पक्की, चार संघ उतरणार मैदानात

सुशांत जाधव
Sunday, 2 August 2020

महिला टी-20 चॅलेंजमध्ये रॉबिन राउंड पद्धतीने सामने खेळवण्यात येणार असून एकूण सात लढती रंगणार आहेत.

यंदाच्या वर्षातील आयपीएलच्या 13 हंगामातील नियोजित महिला टी-20 चॅलेंज स्पर्धा युएईत रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी याला दुजोरा दिल्याचे वृत्त स्पोर्ट्सस्टारने दिले आहे. संयुक्त अरब अमिरातमध्ये रंगणाऱ्या स्पर्धेत 1 ते 10 नोव्हेंबर दरम्यान महिला टी-20 चॅलेंजमधील सामने खेळवण्यात येणार आहेत. कोरोनाजन्य संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षातील आयपीएल स्पर्धा संयुक्त अरब अमिरातमध्ये भरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील वेळापत्रक अद्याप निश्चित झालेले नाही. आज आयपीएल गव्हर्निंग काउंसिलच्या बैठकीत आयपीएलसंदर्भातील वेळापत्रक निश्चित होण्याची शक्यता आहे.  

आयपीएलमध्ये लवकरच महिला पर्व दिसेल, शिखाने व्यक्त केला विश्वास

2018 च्या हंगामात ट्रेलब्लेझर्स आणि सुपरनोव्हास यांच्यात प्रदर्शनिय सामना खेळवण्यात आला होता. या सामन्याच्या माध्यमातून आयपीएलच्या रिंगणात महिला संघ उतरल्याचे पाहायला मिळाले होते. 2019 मध्ये ट्रेलब्लेझर्स आणि सुपरनोव्हास यासह वेलोसिटी हा महिलांचा तिसरा संघ सहभागी झाला. तीन संघातील ही स्प्रधा महिला टी-20 चॅलेंज या नावाने खेळवण्यात आली. यापूर्वी झालेल्या दोन्ही वेळेला हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील सुपरनोव्हास संघाने जेतेपद पटकावले आहे. यंदाच्या हंगामात चार संघ सहभागी होणार असून महिला टी-20 चॅलेंजमध्ये रॉबिन राउंड पद्धतीने सामने खेळवण्यात येणार असून एकूण सात लढती रंगणार आहेत.   

फिफा झाली मेहरबान ; 211 देशांना देणार आर्थिक सहाय्य

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आयपीएल स्पर्धा संयुक्त अरब अमिरातमध्ये रंगणार हे निश्चित झाले असले तरी महिला टी-20 चॅलेंजसंदर्भातील संभ्रम कायम होता. या स्पर्धाही युएईत रंगणार यावर आता शिक्कामोर्बत झाला. भारतामध्ये मार्चपासून क्रिकेट स्पर्धा झालेल्या नाहीत. भारतीय महिला संघाने इंग्लंडमध्ये रंगलेल्या टी-20 विश्वचषकात आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय  सामना खेळला होता. या स्पर्धेत भारतीय महिला संघाचा अंतिम सामन्यात पराभव झाला होता. 


​ ​

संबंधित बातम्या