भारताच्या इंग्लंडमधील कामगिरीची होणार उलटतपासणी 

वृत्तसंस्था
Sunday, 9 September 2018

नवी दिल्ली : इंग्लंड क्रिकेट संघाविरूद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील भारतीय क्रिकेट टीमच्या नुकत्याच झालेल्या कामगिरीची उलटतपासणी नक्कीच केली जाईल, अशी टिप्पणी क्रिकेट प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी रविवारी 'एएनआय'शी बोलताना केली. 

ते म्हणाले, ''मी कोणत्याही प्रकारचे आश्वासन देऊ शतक नाही परंतू प्रत्येक मालिकेनंतर खेळाडूंच्या कामगिरीचा तपासणी केली जाते. संघ व्यवस्थापनाने आपला रिपोर्ट सादर केल्यावर त्यावर नक्कीच नजर टाकली जाईल.''

भारताने इंग्लंडविरुद्धची पाच सामन्यांची कसोटी मालिका यापूर्वीच गमावली आहे. संपूर्ण मालिकेत अपयशी झालेल्या भारतीय फलंदाजांच्या कामगिरीवर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडने 3-1 अशी आघाडी घेतली आहे. ओव्हलवरील पाचव्या आणि अखेरच्या कसोटीत इंग्लंडला पहिल्या डावात 332 धावांची मजल मारता आली आणि 158 धावांनी पिछाडीवर पडलेल्या भारतीय संघाने सहा बाद 174 धावा केल्या आहेत.

​ ​

संबंधित बातम्या