जॉन्टी र्‍होड्स म्हणतो, 'म्हणून' भारतावर माझे प्रेम आहे

टीम ई-सकाळ
Friday, 12 June 2020

जॉन्टी र्‍होड्सच्या मुलीचा जन्म भारतात मुंबई मध्ये झाला होता. त्यामुळे त्याने आपल्या मुलीचे नाव ‘इंडिया’ असे ठेवले आहे.

दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू जॉन्टी र्‍होड्स याचे भारतावर असणारे प्रेम सर्वांनाच माहित आहे. जॉन्टी र्‍होड्सच्या मुलीचा जन्म भारतात मुंबई मध्ये झाला होता. त्यामुळे त्याने आपल्या मुलीचे नाव ‘इंडिया’ असे ठेवले आहे. त्यानंतर जॉन्टी ऱ्होड्सने आता भारतासंदर्भात एक व्हिडिओ ट्विटर या सोशल माध्यमावरून शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये कोरोनामुळे क्वारंटाइन करण्यात आलेले नागरिक क्रिकेट खेळण्याचा आनंद घेत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सोशल माध्यमावर जॉन्टी र्‍होड्सने शेअर केलेल्या या व्हिडिओची चर्चा सुरु आहे. 

दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू जॉन्टी र्‍होड्स, इंग्लंडचा माजी खेळाडू केविन पीटरसन असे काही आंतरराष्ट्रीय क्रिकेट जगतातील खेळाडू हे अधून मधून आपला वेळ भारतात व्यतीत करत असतात. त्यातल्या त्यात जॉन्टी र्‍होड्स नेहमीच आपल्या सोशल माध्यमावरून भारताबद्दल असणारे प्रेम व्यक्त करत असतो. यावेळी देखील जॉन्टी र्‍होड्सने अशीच एक पोस्ट ट्विटरवर शेअर करत, भारतावर आपले प्रेम असण्याचा खुलासा केला आहे. जॉन्टी र्‍होड्सने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये कोरोनामुळे क्वारंटाइन करण्यात आलेले नागरिक क्रिकेट खेळत असल्याचे दिसत आहे. यासोबतच जॉन्टी र्‍होड्सने या ट्विट मध्ये, लोक मला वारंवार विचारतात की भारताबद्दल तुला इतके प्रेम का आहे ? मात्र हा व्हिडिओ पाहून मला त्यांना वेगळे उत्तर देण्याची गरज नसल्याचे त्याने म्हटले आहे.    

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू जॉन्टी ऱ्होड्स हा त्याच्या फलंदाजीसोबत प्रभावशाली क्षेत्ररक्षणासाठी म्हणून ओळखला जातो. यापूर्वी इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (आयपीएल) जॉन्टी ऱ्होड्सने मुंबई इंडियन्स या संघाच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळली होती. तसेच भारतीय क्रिकेट संघाच्या क्षेत्ररक्षण  प्रशिक्षक पदासाठीही अर्ज दाखल केला होता, मात्र यासाठी त्याची निवड झाली नाही. १९९२ मधील विश्वचषक सामन्यात जॉन्टी ऱ्होड्सने पाकिस्तानचा फलंदाज इंझमाम उल हक याला अफलातून  क्षेत्ररक्षण करत, धावबाद होण्यास भाग पाडले होते. २००३ साली केनिया विरुद्धच्या लढतीनंतर जॉन्टी ऱ्होड्सने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रकारातून निवृत्ती घेतली होती.                              
 


​ ​

संबंधित बातम्या