कशाला हवा अंपायर कॉल ? विकेटवर बॉल लागला म्हणजे आऊटच !!

शैलेश नागवेकर
Sunday, 12 July 2020

डिआरएस (पंचांच्या निर्णयाविरुद्ध दाद मागण्याची सुविधा) असतानाही केवळ 'अंपायर कॉल' म्हणून पायचीतबाबतचा निर्णय अजूनही वादग्रस्त ठरत आहे.

नवी दिल्ली : डिआरएस (पंचांच्या निर्णयाविरुद्ध दाद मागण्याची सुविधा) असतानाही केवळ 'अंपायर कॉल' म्हणून पायचीतबाबतचा निर्णय अजूनही वादग्रस्त ठरत आहे. चेंडू यष्टींवर लागत असेल तर फलंदाजाला पायचीत ठरवा असा सोपा मार्ग मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सुचवला आहे.

विराट कोहली असलेल्या वर्ल्ड टी -20 संघाचे नेतृत्व हिटमॅन रोहितकडे   

डिआएसचा अवलंब करण्यात येत असूनही अजून पायचीतच्या निर्णयाबाबत संभ्रम आहे. चेंडू यष्टींना लागत असला तरी पंचांनी जर नाबाद दिलेले असेल तर फलंदाज नाबाद ठरतो. शेवटी हाच अंपायर कॉल निर्णायक ठरत असतो. पण आयसीसीचा हा नियम तेंडुलकला मान्य नाही. चेंडू किती प्रमाणात यष्टींवर लागतो हे महत्वाचे नाही. तो यष्टींवर किंचितही लागत असेल तर फलंदाजाला बाद ठरवावे असे सचिनचे म्हणणे आहे. सोशल मीडियाच्या ट्विटरद्वारे सचिनने आपले मत मांडले. 

ला लिगा : रिअल माद्रिद-बार्सिलोनामध्ये रस्सीखेच कायम 

ब्रायन लाराबरोबर लाईव्ह चॅट करत असताना सचिनने पायचीतबाबतचा व्हिडिओही शेअर केला. डिआरएसचा वापर करून आता बराच काळ झाला आहे. पण अजूनही चेंड यष्टींवर किती प्रमाणात लागतो आहे यावर पायचीतचा निर्णय ठरतो हा आयसीसीचा नियम आपल्याला पटत नाही, असे सचिनने म्हटले आहे. पायचीतबाबत डिआरएसचा अवलंब करण्यात आला तरी मैदानावरील पंचांनी काय निर्णय दिला आहे याचे महत्व अधिक असते त्यामुळे कोणत्याही बाजूने निकाल लागला तरी एक तर फलंदाज किंवा गोलंदाज नाराज होतात. त्यामुळे पूर्ण निर्णय तिसऱ्या पंचांकडे सोपवावा. टेनिसमध्ये जसे चेंडू 'इन' किंवा 'आऊट' हे ठरवले जाते त्यामुळे अर्धवट निर्णय नसतो, असे ठाम मत सचिनने व्यक्त केले.

 

 


​ ​

संबंधित बातम्या