प्रशिक्षक निवडीची एवढी घाई का? 

वृत्तसंस्था
Thursday, 18 July 2019

नवी दिल्ली : बीसीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधरण सभेची आणि त्याचबरोबर निवडणूकही होण्याची तारीख निश्‍चित झालेली असताना प्रसासकीय समितीला टीम इंडियाच्या व्यवस्थापनाची नवी नियुक्ती करण्याची एवढी घाई का लागली आहे, असा प्रश्‍न बीसीसीआयच्या काही पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे. 

विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या कामगिरीचा प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांच्याकडून आढावा घेतला जाईल असे प्रशासकीय समितीने अगोदर जाहीर केले होते, आता लगेचच नव्या संघ प्रशासनाच्या सर्व जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली. त्यामुळे लगेचच इतकी घाई करण्याचे कारण काय, असे बीसीसीआयच्या काही पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा 22 ऑक्‍टोबरला होणार आहे. 
सर्वच बाबतीत हे चुकीचे आहे. याच प्रशासकीय समितीने अगोदर बीसीसीआयच्या निवडणुकीची तारीख जाहीर केली आणि आता ते प्रशिक्षकांच्या निवडीची घाई करत आहेत. असे करून काही ठराविक जणांना प्रशिक्षक नियुक्त करायचे आहे का? असा प्रश्‍न बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. 

विश्‍वकरंडक स्पर्धेतील कामगिरीचा आढावा केवळ व्यवस्थापक किंवा ठराविक प्रशिक्षकांकडूनच घेण्याऐवजी फिजिजो, ट्रेनर यांनाही आपला अहवाल सादर करायला सांगायला हवे होते. त्यामुळे सर्व गोष्टी स्पष्ट झाल्या असत्या असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. फलंदाजीचे प्रशिक्षक संजय बांगर यांनी फलंदाजीच्या चौथ्या क्रमांकावरील खेळाडूबाबत झालेला संभ्रम दूर करावा. विजय शंकरला झालेल्या दुखापतीची माहिती होती का? याबाबतही बांगर यांनी खुलासा करण्याची गरज असल्याचे बीसीसीआयचे म्हणणे आहे.

​ ​

संबंधित बातम्या