जागतिक मैदानी स्पर्धा : कोण होणार स्प्रींट क्वीन?

नरेश शेळके
Saturday, 21 September 2019

जागतिक ऍथलेटिक्‍स स्पर्धेच्या इतिहासात महिलांच्या शंभर मीटर शर्यतीत केवळ चार सुवर्णपदके सोडली तर इतर बारा सुवर्णपदके अमेरिका आणि जमैकाच्या धावपटूंनी जिंकली आहेत. 2001 मध्ये युक्रेनची झॅना पिंटोसेव्हीच आश्‍चर्यजनकरित्या जिंकली होती. विशेष म्हणजे एडमंटनच्या त्या स्पर्धेत अमेरिका किंवा जमैकाच्या धावपटूंना शंभर मीटर शर्यतीत पदक जिंकता आले नव्हते. त्यानंतर सुवर्णपदकासाठी अमेरिका विरुद्ध जमैका अशीच रंगत पाहायला मिळत आहे.

यंदा दोहा येथे होणारी जागतिक स्पर्धाही त्यास अपवाद नाही. रिओ ऑलिंपिक विजेती एलेन थॉम्पसन, तीन वेळा विश्‍वविजेतेपद मिळविणारी शेली ऍन-फ्रेझर प्रिसे या जबरदस्त फार्मात असलेल्या जमैकन धावपटूंपुढे विद्यमान विजेती टोरी बोवी, इंग्लिश गार्डनर आणि मोरोलेक अकीनोसन या अमेरिकन धावपटू आव्हान उभे करू शकतील काय? याबाबत चांगलीच चर्चा रंगली आहे. थॉम्पसन आणि शेली यांच्या नावावर यंदाच्या मोसमात 10.73 सेकंद अशी संयुक्तपणे वेगवान वेळ आहे. जमैकच्या राष्ट्रीय स्पर्धेत दोघांनी ही समान वेळ दिली होती.

मात्र, त्यात थॉम्पसनला विजयी घोषित करण्यात आले होते. यंदा पाच स्पर्धांत सहभागी झालेली टोरी बोवी अकरा सेंकदांच्या आत धावलेली नाही तर मोरोलेक ही प्रथमच जागतिक पातळीवर शंभर मीटर शर्यतीत भाग घेणार आहे. यापूर्वी तिने रिओ ऑलिंपिक आणि लंडन जागतिक स्पर्धेत रिलेत भाग घेतला होता. एलेन किंवा शेलीपुढे अमेरिकन धावपटूपेक्षा ग्रेट ब्रिटनची डायना अशर स्मिथ, आयव्हरी कोस्टची मॅरी जोस टा लू या दोघी आव्हान निर्माण करण्याची शक्‍यता आहे. कारण डायनाच्या नावावर यंदा 10.75 तर मॅरीच्या नावार 10.88 सेकंद अशी वेगवान वेळ आहे.

एलेनने यंदा सहा स्पर्धांत भाग घेतला त्यापैकी फक्त शांघाय डायमंड लिगमध्ये ती पराभूत झाली. मातृत्व सुखामुळे शेली दोन वर्षांपूर्वी लंडनमध्ये सहभागी होऊ शकली नव्हती. त्यामुळे जागतिक स्पर्धेत यशस्वी पुनरागमन करण्यासाठी ती उत्सुक आहे. यंदा तिने नऊ स्पर्धांत भाग घेतला त्यापैकी तीन स्पर्धांत तिला अव्वल स्थान गमवावे लागले. हे सातत्य इतर धावपटूंमध्ये नसल्यामुळेच यंदा स्प्रींट क्वीन किताबासाठी एलेन व शेली या जमैकन धावपटूच प्रबळ दावेदार आहेत, असे म्हटले तर वावगे ठरू नये. 

महिला शंभर मीटर 
जागतिक विक्रम ः 10.49 सेकंद-फ्लोरेन्स ग्रिफीथ जॉयनर (1988) 
स्पर्धा विक्रम ः 10.70 सेकंद - मरियन जोन्स (1999) 
यंदाची सर्वोत्तम वेळ ः 10.73 सेकंद - एलेन थॉम्पसन, शेली ऍन-फ्रेझर प्रिसे (संयुक्तपणे) 
प्राथमिक फेरी (28 सप्टें.-सायंकाळी 7), उपांत्य फेरी (29 सप्टें.-रात्री 11.50), अंतिम फेरी (30 सप्टें.-पहाटे 1.50) 

​ ​

संबंधित बातम्या