...जेंव्हा विराट कोहलीने भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले ; वाचा सविस्तर

टीम ई-सकाळ
Tuesday, 18 August 2020

आजच्याच दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पदार्पण केलेल्या विराटने आत्तापर्यंत 21,901 धावा काढल्या आहेत.

भारतीय क्रिकेटसाठी 2008 हे वर्ष नक्कीच खास ठरले होते. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियामध्ये कॉमनवेल्थ बँक ट्राय सिरीजमध्ये जिकंली होती. त्याच्या दोनच दिवसांपूर्वी 19 वर्षीय खेळाडूच्या नेतृत्वाखालील अंडर-19 भारतीय संघाने मलेशियात झालेल्या विश्वचषकात विजय मिळवला होता. आणि त्याच्या पुढील आठवड्यातच इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) मधील फ्रँचायझी असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने या खेळाडूवर शिक्कामोर्तब करत, आपल्या संघात सामील केले.   

त्यानंतर हा खेळाडू म्हणजे विराट कोहली आणि त्याने आयपीएलच्या पहिल्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) कडून 14 पैकी 13 सामने खेळले. त्यावेळेस आरसीबीकडून खेळताना राहुल द्रविड, जॅक कॅलिस, रॉस टेलर, मिसबाह-उल-हक, एस चंद्रपॉल आणि कॅमेरून व्हाईट या खेळाडूंच्या नंतर विराट कोहलीला फलंदाजीसाठी संधी मिळत असे. त्यामुळे सुरवातीला त्याला फलंदाजीची संधी मिळण्यासाठी धीर धरावा लागला. मात्र त्यानंतर कोहलीने इतिहास रचत, 2016 मधील आयपीएल हंगामात 1000 हुन अधिक धावा केल्या. यानंतर आरसीबी कडूनच प्रत्येक हंगामात खेळण्यासाठी विराट कोहली 17 कोटी रुपये मानधन घेत आहे. 

दिल्लीच्या संघाने 2008 मध्ये रणजी ट्रॉफी जिंकली. दिल्लीच्या या विजयात विराट कोहलीने मोलाचा वाटा उचलत, दोन शतके झळकावली होती. त्यानंतर भारतीय संघ जुलै मध्ये श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार होता. आणि नेमके याच वेळेस निवड समिती नव्या दमाच्या खेळाडूच्या शोधात होती. याचा फायदा विराट कोहलीला मिळाला. मात्र श्रीलंकेच्या दौऱ्यात भारतीय संघाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांना दुखापतीमुळे या दौऱ्याला मुकावे लागले होते. 

18 ऑगस्ट 2008, विराट कोहलीला भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळाले - 

श्रीलंकेतील डंबुला येथील सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकत फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय घेतला. सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांच्या अनुपस्थितीत गौतम गंभीर आणि विराट कोहलीने सलामीवीर म्हणून भारतीय फलंदाजीची सुरवात केली. गौतम गंभीर सामन्यातील दुसऱ्याच चेंडूवर बाद झाला. तर तिसऱ्या षटकात विराट कोहलीने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिल्या चेंडूचा सामना केला. मैदानावर उतरलेल्या विराट कोहलीने सुरवातीची 30 मिनिटे श्रीलंकेचे गोलंदाज चामिंडा वास व कुलसेकरा यांचा धैर्याने सामना केला. यानंतर सामन्याच्या सातव्या षटकात चामिंडा वासच्या गोलंदाजीवर सुरेख फ्लिक करत, विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिला चौकार खेचला. त्यानंतर कुलसेकराच्या गोलंदाजीवर विराट कोहली 12 धावांवर यष्टिचित झाला. या सामन्यात भारताने सर्व बाद 146 धावा केल्या. त्यामुळे श्रीलंकेने 8 गडी राखत भारतावर विजय मिळवला. 

याव्यतिरिक्त, त्या मालिकेमधील सर्व सामन्यांमध्ये विराट कोहलीने सलामीवीर म्हणून भारतीय फलंदाजीची सुरवात केली. व चौथ्या एकदिवसीय सामन्यात त्याने आपले पहिले अर्धशतक केले. त्यानंतर पुन्हा सचिन आणि सेहवागचे संघात पुनरागमन झाले. व त्यामुळे विराट कोहलीला पुन्हा संघात स्थान मिळवण्यासाठी 13 महिन्यांची प्रतीक्षा करावी लागली. 

त्यानंतर आजच्याच दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पदार्पण केलेल्या विराटने आत्तापर्यंत 21,901 धावा काढल्या आहेत. आणि सध्याला तरी विराट कोहलीच्या या रेकॉर्ड जवळ कोणताच फलंदाज नाही. दक्षिण आफ्रिकेचा हाशिम आम्ला 16,776 धावांसह कोहली नंतर दुसऱ्या स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर 14,798 धावांनी तिसऱ्या नंबरवर आहे. विराट कोहलीने टी-20 आणि कसोटीत अनुक्रमे 2010 आणि 2011 मध्ये पदार्पण केले. 

विराट कोहलीच्या आजपर्यंतच्या स्कोरकार्डवर एक नजर टाकल्यास क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये, तो सध्याचा जगातील सर्वोत्तम फलंदाज असल्याचे सिद्ध होते.        

  Ti Ti Ti Ti Odi Odi Odi Odi Odi T20i T20i T20i T20i T20i
Years M Runs Avg 100s M Runs Avg SR 100s M Runs Avg SR 50+
2008 - - - - 5 159 31.8 66.5 0 - - - - -
2009 - - - - 10 325 54.2 84.4 1 - - - - -
2010 - - - - 25 995 47.4 85.1 3 2 26 - 123.8 0
2011 5 202 22.4 0 34 1381 47.6 85.6 4 4 61 15.3 117.3 0
2012 9 689 49.2 3 17 1026 68.4 93.8 5 14 471 13.3 132.7 4
2013 8 616 56 2 34 1268 52.8 97.5 4 1 29 29 131.8 0
2014 10 847 44.6 4 21 1054 58.6 99.6 4 7 385 96.3 133.7 5
2015 9 640 42.7 2 20 623 36.6 80.6 2 2 44 22 157.1 0
2016 12 1215 75.9 4 10 739 92.4 100 3 15 641 106.8 140.3 7
2017 10 1059 75.6 6 26 1460 76.8 99.1 6 10 299 37.4 152.6 2
2018 13 1312 55.1 5 14 1202 133.6 102.6 6 10 211 30.1 122 1
2019 8 612 68 2 26 1377 59.9 96.4 5 10 466 77.7 147.9 5
2020 2 38 9.5 0 6 258 43 91.8 0 7 161 32.2 141.2 0
OverAll 86 7240 53.6 27 248 11867 59.3 93.3 43 82 2794 50.8 138.2 24

विराट कोहलीला भारतीय संघात पदार्पण करून १२ वर्षे पूर्ण झाली. म्हणून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सोशल मीडियाच्या ट्विटरवर केलेले ट्विट -


​ ​

संबंधित बातम्या