विराटविरुद्ध केलेल्या तक्रारीचे पुढे काय होणार ? नीती अधिकारी डी. के. जैन म्हणतात...

टीम ई-सकाळ
Monday, 6 July 2020

भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या विरोधात दुहेरी हितसंबंधांबाबत करण्यात आलेली तक्रार मिळाली असून प्रथम या तक्रारीची शहानिशा करण्यात येईल, असे बीसीसीआयचे नीती अधिकारी डी. के. जैन यांनी सांगितले. 

नवी दिल्ली : भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या विरोधात दुहेरी हितसंबंधांबाबत करण्यात आलेली तक्रार मिळाली असून प्रथम या तक्रारीची शहानिशा करण्यात येईल, असे बीसीसीआयचे नीती अधिकारी डी. के. जैन यांनी सांगितले. 

मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेचे आजीवन सदस्य संजीव गुप्ता यांनी याअगोदरही माजी खेळाडूंवर असेच आरोप केलेले आहेत; पण त्यातून सर्वांची सुटका झालेली आहे. संजीव गुप्ता यांनी आता विराट कोहलीकडे मोर्चा वळवला आहे. कोहली हा टीम इंडियाचा कर्णधारही असून खेळाडूंशी करार करणाऱ्या स्वतःच्या कंपनीत संचालक आहे. अशा प्रकारे तो दुहेरी हितसंबंधांच्या नियमाचा भंग करत असल्याचे शर्मा यांचे म्हणणे आहे. 

विराटच्या विरोधातील तक्रार मला मिळाली नाही. प्रथम मी त्याचा अभ्यास करेन, याची दखल घ्यायची की नाही हे ठरवेन आणि त्यानंतर कोहलीकडे या संदर्भात विचारणा करेन. 
- डी. के. जैन, बीसीसीआयचे नीती अधिकारी

 

 


​ ​

संबंधित बातम्या