डेक्कन चार्जर्सबाबत बीसीसीआयने एक दिवस नंतर निर्णय घेतला असता तर ?

संजय घारपुरे
Saturday, 18 July 2020

भारतीय क्रिकेट मंडळाने डेक्कन चार्जरला बडतर्फ करण्याची नोटीस दिली होती आणि नोटीस कालावधी संपण्यापूर्वी एक दिवस अगोदर त्यांच्या बडतर्फीचा निर्णय घेतला. त्याचा फटका आता भारतीय क्रिकेट मंडळास बसत असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. 

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट मंडळाने डेक्कन चार्जरला बडतर्फ करण्याची नोटीस दिली होती आणि नोटीस कालावधी संपण्यापूर्वी एक दिवस अगोदर त्यांच्या बडतर्फीचा निर्णय घेतला. त्याचा फटका आता भारतीय क्रिकेट मंडळास बसत असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. 

भारतीय क्रिकेट मंडळाने केलेली बडतर्फी अयोग्य असल्याचे डेक्कन चार्जर्सची मालकी असलेल्या डेक्कन क्रॉनिकल लिमिटेडचे मत होते. त्यावेळी अन्य फ्रॅंचाईजी जास्त नियमाचा भंग करीत असल्याचे त्यांचे मत होते. मात्र आपल्यालाच लक्ष्य केले. तसेच हा निर्णय अगोदर घेतला असे सांगत त्यांनी दाद मागितली होती. 

भारतीय क्रिकेट मंडळाने डेक्कन क्रॉनिकलबरोबरील करार एक दिवस अगोदर रद्द केला. त्यांनी हा निर्णय बेकायदेशीर तसेच मुदतीपूर्वी घेतला असल्याचे सांगितले होते. लवादानेही हा निर्णय मुदतीपूर्वी घेतल्याचे म्हटले आहे, असे आशिष प्यासी यांनी मनीकंट्रोल संकेतस्थळास सांगितले. प्यासी हे डेक्कन क्रॉनिकल लिमिटेडची बाजू मांडत असलेल्या धीर अँड धीर असोसिएटस्‌चे असोसिएट पार्टनर आहेत. 

भारतीय मंडळास एकंदर 4 हजार 800 कोटी रुपये देण्यास सांगितले आहे. त्यात 2021 पासून सुनावणी सुरु झाली हे लक्षात घेऊन वर्षामागे दहा टक्के व्याजदर आकारण्यात आला आहे तसेच 50 लाखाचे शुल्कही त्यात आहे.


​ ​

संबंधित बातम्या