परदेशी फुटबॉलपटू काय फायदयाचे?

दीपक कुपनावर
Tuesday, 28 July 2020

वेडेपणा हवा- ‌डिपार्टमेंट म्हणून मर्यादा असल्याने एअर इंडियाला मोठ्या संघांच्या तुलनेत पावपट खर्चात संघ चालवावा लागायचा. प्रतिस्पर्धी कोणी असो त्याला सोडायचं नाही असा वेडेपणा संघात ठासून भरला . त्यामुळे एअर इंडिया विरुद्ध सामना म्हणजे सर्वच संघ दचकायचे. युवा खेळाडूही भविष्यासाठी झपाटून खेळायचे. या वेडेपणामूळेच एअर इंडियाने 'लो बजेट' असतानाही यशोशिखरावर भरारी घेतल्याचे श्री. घोष यांनी सांगितले.
 

"अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) इंडियन फुटबॉल लिग (आय लिग)  मधून विभागाचे संघ बाहेर काढले. परिणामी, या संस्थात नोकरीच्या संधी कमी झाल्याने खेळाडू अडचणीत आले आहेत.  इंडियन सुपर लीग (आयएसएल )  आणि आय लिगमध्ये स्ट्रायकर  आणि स्टॉपर  या महत्त्वाच्या जागा परदेशी खेळाडूंनी बळकावल्या आहेत.  त्यामुळे खेळण्याची संधी नसल्याने भारतीय खेळाडूंना या जागावर  अनुभव मिळत नाही.  त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची पिछेहाट आहे . यामुळेच परदेशी फुटबॉलपटू काय फायद्याचे असा सवाल  मुंबईच्या एअर इंडिया फुटबॉल संघाचे माजी प्रशिक्षक बिमल घोष यांनी केला.

#500_Test Wicket Club List: कोणी-कोणाची विकेट घेत गाठला होता पाचशेचा टप्पा?

इंडियन फुटबॉल कोचेस असोसिएशन मार्फत 'चाट विईथ लिजंड कॉचेस' ही मुलाखतीची मालिका समाज माध्यमावर सुरू आहे. यातील पाचवे पुष्प गुफताना श्री. घोष बोलत होते. समालोचक अर्जुन पंडित यांनी ही मुलाखत घेतली. ." दुखापतीमुळे खेळ थांबवुन तरुणपणीच प्रशिक्षकपदाची जवाबदारी स्वीकारली. तब्बल 15 वर्षे एअर इंडिया  संघाची सर्वसाधारण ते लढवय्या अशी  मेहनतीने ओळख निर्माण केली. शेकडो प्रतिभावान खेळाडूंचे  पदार्पणासह जडणघडण केली.  शासनांतर्गत  येणाऱ्या त्रिवेंद्रम स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीटी) ,चेन्नई इंडियन बँक,  मुंबई ऑइल अँड नॅचरल गॅस कार्पोरेशन (ओएनजीसी), बंगलोर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) हे संघ प्रायव्हेट लिमिटेड नाहीत  या निकषावर  आय लिगसाठी अपात्र ठरविण्यात आले. वस्तुतः  या संघांचे भारतीय फुटबॉल मध्ये मोठे योगदान आहे. या संस्थानी अनेक फुटबॉलपटूंना नोकऱ्या दिल्याने त्यांना स्थैर्य मिळाले. फुटबॉल मध्ये करियर करणाऱ्या खेळाडूसाठी या संघातील नोकऱ्या हे प्रेरणास्तोत्रे होते. या संघांना राष्ट्रीय स्तरावरील दरवाजे बंद झाल्याने आपोआप नोकरीच्या संधी बंद झाल्या. सहाजिकच फुटबॉलपटूचे भविष्य अंधकारमय झाले.  मुळातच  आपल्या देशातील फुटबॉल क्षेत्र अर्ध व्यवसायिक आहे. एआयएफएफने खेळाडूंच्या भवितव्याचा विचार करून या निर्णयाचा फेरविचार करण्याची गरज आहे."

 ENGvsWI : कॅरेबियन ताफ्याचा भ्रमनिरास; अखेर साहेबांनी बाजी पलटली!  

परदेशी फुटबॉलपटूबाबत बोलताना श्री घोष म्हणाले, एअर इंडिया संघ तब्बल दहा वर्षे आय लिग मध्ये परदेशी खेळाडू ऐवजी स्थानिक खेळाडूंना प्राधान्य देऊन खेळला. देशभरात सुमारे तीनशेहून अधिक परदेशी फुटबॉलपटू विविध संघातून खेळत आहेत. यातील हातावर मोजण्याइतपतच दर्जेदार आहेत. कौशल्यापेक्षा ताकद हाच त्यांच्या खेळण्याचा मंत्र आहे. त्यांच्यामुळे स्ट्रायकर  आणि स्टॉपर  म्हणून भारतीय खेळाडूंच्या विकासाला ब्रेक लागला आहे. या जागी खेळण्याचा अनुभव नसल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर  भारतीय खेळाडू कमी पडतात. त्यासाठी परदेशी खेळाडूंची संख्या मर्यादित करायला हवी. परदेशातील विविध क्लबमध्ये ज्यावेळी भारतीय खेळाडूची संख्या वाढेल त्याच वेळी आपल्याला विश्वचषक स्पर्धेत सहभागाची आशा  असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 


​ ​

संबंधित बातम्या