T-10 Cricket मध्ये शतकी धमाका; या 19 वर्षीय फलंदाजाने केला पराक्रम

टीम ई-सकाळ
Friday, 26 June 2020

लॉकडाउननंतर वेस्ट इंडिजमध्ये क्रिकेट पूर्वपदावर येत असताना या खेळाडूने आपल्या धमाकेदार खेळीनं सर्वांचे लक्ष वेधले आहे.

सेंट लूसिया: दक्षिण आफ्रिकेमध्ये झालेल्या 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडिज संघाचे नेतृत्व करणाऱ्या 19 वर्षीय मेलिअसने क्रिकेटमधील  T-10 स्पर्धेत शतकी धमाका केला आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये पार पडलेल्या विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडिजकडून सर्वाधिक धावा करण्याचा मान मिळवणाऱ्या मेलिअसने नायजजेरियाविरुद्ध एकमात्र अर्धशतकी खेळी केली होती. या अधर्धशतकाच्या जोरवर वेस्ट इंडिजच्या युवा संघाला सामन्यात यश देखील मिळाले होते. या कामगिरीच्या जोरावर मेलिअस याला वेस्ट इंडिज अ संघात स्थान मिळाले होते. लॉकडाउननंतर वेस्ट इंडिजमध्ये क्रिकेट पूर्वपदावर येत असताना या खेळाडूने आपल्या धमाकेदार खेळीनं सर्वांचे लक्ष वेधले आहे.

#क्रिकेट_डायरी : या पाच भारतीय फलंदाजांनी पहिल्या ODI शतकासाठी खूप वेळ घेतला!

सेंट लूसिया टी 10 ब्लास्ट स्पर्धेत मेलिअसने धमाकेदार खेळी नोंदवली आहे.  
कोविड-19 च्या संकटामुळे खेळावर मोठा परिणाम झाला आहे. मार्चपासून क्रिकेटची मैदाने ओस पडली आहेत. मोठ्या ब्रेकनंतर वेस्ट इंडिजचा संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटला पुन्हा पटरीवर आणण्यासाठी इंग्लंडला रवाना झाला आहे. 8 जूलैला इंग्लंड- वेस्ट इंडिज यांच्यातील द्विपक्षीय कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेपूर्वी वेस्ट इंडिजमध्ये  सेंट लूसिया टी-10 लीगलाही सुरुवात झाली आहे. सेंट लूसिया टी-10 लीगमध्ये ग्रॉस इसलेट केनन ब्लास्ट आणि वियक्स फॉर्ट नॉर्थ रेडर्स यांच्यात झालेल्या सामन्यात मलिअसने आपली छाप उमटवली.  मेलिअसच्या शतकाच्या जोरावर ग्रॉस इसलेट केनन ब्लास्टने  वियक्स फॉर्ट नॉर्थ रेडर्सला एकतर्फी पराभूत केले.  

आयपीएलवरुन बीसीसीआय-पीसीबी आमने सामने

मेलिअस किमानीने ग्रॉस इसलेटकडून खेळताना 34 चेंडूत नाबाद 103 धावांची धमाकेदार खेळी केली. त्याच्या या खेळीत 4 चौकार आणि 11 षटकारांची आतषबाजी केली. वेस्टइंडीज अंडर-19 च्य़ा कर्णधाराने सलामीच्या  टॅरिक गॅब्रियलच्या (50) साथीनं 10 षटकात संघाच्या धावफलकावर बिनबाद 166 धावा लावल्या. मेलिअसने डावाच्या अखेरच्या षटकात पहिल्या पाच चेंडूवर सलग 5 षटकार खेचले. शेवटच्या चेंडूवर चौकार लगावल्याने एका षटकात सहा षटकारांची संधी थोडक्यात हुकली. डोंगराऐवढ्या धावसंख्येचा पाठलाग करताना प्रतिस्पर्धी संघ 5 बाद 103 धावांतच आटोपला. 


​ ​

संबंधित बातम्या