कोरोनानंतर 'या' गोलंदाजाने घेतली पहिली आंतरराष्ट्रीय विकेट   

टीम ई-सकाळ
Thursday, 9 July 2020

इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरु झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडीज संघाच्या केमर रोचने कोरोनाच्या काळानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधील  पहिले षटक टाकले.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील काही महिन्यांपासून क्रिकेटच्या स्पर्धा थांबवण्यात आल्या होत्या. त्यानंतर कोरोनाची खबरदारी घेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटला काल बुधवार पासून सुरवात करण्यात आली आहे. यजमान इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात साऊथॅम्प्टन मैदानावरील एजेस बाऊल येथे पहिल्या कसोटी सामन्यास सुरवात झाली आहे. या सामन्यामध्ये पहिल्या दिवशीचा खेळ सुरु होण्यापूर्वी पावसाने काही काळ अडथळा आणला होता. त्यामुळे सामन्याला सुरुवात न करता उपहाराची विश्रांती घेण्यात आली होती. मात्र त्यानंतर इंग्लंडच्या बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि खेळास सुरवात झाली. यावेळेस वेस्ट इंडीजचा वेगवान गोलंदाज शॅनन गॅब्रिएल कोरोनानंतरचा आंतरराष्ट्रीय विकेट घेणारा पहिला गोलंदाज ठरला.

BlOG : गोऱ्यांच्या देशात क्रिकेट मैदानावर उठणार अन्यायाविरोधात आवाज

इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरु झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडीज संघाच्या केमर रोचने कोरोनाच्या काळानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधील  पहिले षटक टाकले. त्यानंतर वेस्ट इंडीज संघाला विकेट मिळवण्यासाठी फार काळ वाट पहायला लागली नाही. केमर रोच नंतर शॅनन गॅब्रिएलने गोलंदाजी करताना षटकातील चौथ्या चेंडूवर इंग्लंडचा सलामी फलंदाज डॉम सिब्लीला बाद केले. त्यामुळे कोरोनाच्या काळानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिली विकेट घेणारा गोलंदाज म्हणून वेस्ट इंडीज संघाचा शॅनन गॅब्रिएल हा क्रिकेटपटू ठरला आहे. त्यानंतर पुन्हा पावसाचे आगमन झाल्यामुळे खेळ थाबवावा लागला. पहिल्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत इंग्लंड संघाचे रोरी बर्न्स आणि जो डेन्ली हे खेळात असून, इंग्लंडचा स्कोर 35 धावांवर 1 बाद असा होता. 

 

दरम्यान, खेळाच्या सुरवातीला इंग्लंड आणि वेस्ट इंडिज संघातील खेळाडूंनी मैदानावर येत पायाच्या एका गुडघ्यावर बसत वर्णभेदाविरुद्धच्या लढाईला समर्थन दिले. तसेच वेस्ट इंडिज संघाच्या क्रिकेटपटूंनी वर्णद्वेषाविरुद्धच्या लढाईला समर्थन देण्यासाठी म्हणून ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’ हा लोगो असलेला जर्सी परिधान करत या सामन्याच्या वेळेस मैदानावर उतरले. अमेरिकेत जॉर्ज फ्लाइड या कृष्णवर्णीय नागरिकाचा मिनियापोलीस शहरातील एका श्वेत पोलीस अधिकाऱ्याच्या मारहाणीत मृत्यू झाला होता. त्यानंतर संपूर्ण जगभरात वर्णभेदाविरुद्ध ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’ आंदोलन सुरू झाले होते. या आंदोलनाला क्रीडा क्षेत्रातील अनेक खेळाडूंनी पाठिंबा दर्शवला आहे.                    

 


​ ​

संबंधित बातम्या