#वर्णभेदाचा_खेळ :विंडीजचा संघ कॉलर 'टाइट' करुन 'फाइट' देणार

टीम ई-सकाळ
Tuesday, 30 June 2020

वेस्ट इंडिज संघाचे क्रिकेटपटू वर्णभेदाविरुद्धच्या लढाईला समर्थन देण्यासाठी ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’ चा लोगो असलेला जर्सी परिधान करणार आहेत.

कोरोनाच्या संकटातून सावरुन क्रिकेट जगतातील खेळाडू पुन्हा मैदानात उतरण्यासाठी सज्ज होत आहेत. काही दिवसांपूर्वीच वेस्ट इंडिजचा संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना झाला. पुढील महिन्यातील ८ जुलै पासून वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेस सुरवात होणार आहे. या सामन्यांमध्ये वेस्ट इंडिज संघाचे क्रिकेटपटू वर्णभेदाविरुद्धच्या लढाईला समर्थन देण्यासाठी ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’ चा लोगो असलेला जर्सी परिधान करणार आहेत. या जर्सीसाठी वेस्ट इंडिजच्या क्रिकेट संघाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (आयसीसी) परवानगी देण्यात आलेली आहे.

भारतीय संघाच्या नेतृत्वासाठी रोहित शर्मा रेडीमेड ऑप्शन 

अमेरिकेतील जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय नागरिकाला मिनियापोलिस शहरातील एका श्वेत पोलिस अधिकाऱ्याने मारहाण केली होती. त्यामध्ये जॉर्ज फ्लॉयडचा दुर्देवी मृत्यू झाला होता. त्यानंतर अमेरिकेसह जगभरात वर्णभेदाविरुद्ध आवाज उठण्यास सुरवात होऊन, ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’ हे आंदोलन सुरु झाले. या आंदोलनाला क्रीडा क्षेत्रातील अनेक खेळाडूंनी पाठिंबा दर्शवला आहे. तर क्रिकेट जगतातील डॅरेन सॅमी, ख्रिस गेल आणि ड्वेन ब्राव्हो यांनी आपल्यासोबत घडलेल्या वर्णभेदाच्या आठवणी जगासमोर ठेवल्या. यानंतर वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा कर्णधार जेसन होल्डर याने देखील, वर्णद्वेषासाठी मॅच फिक्सिंग किंवा डोपिंग सारखीच शिक्षा असावी, असे म्हटले होते. त्यामुळे वर्णभेदाविरुद्ध चालू झालेल्या या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी म्हणून, वेस्ट इंडिज संघाने इंग्लंडच्या दौऱ्यात आपल्या जर्सीवर ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’ चा लोगो लावण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेदरम्यान वेस्ट इंडिज संघातील खेळाडूंच्या टी-शर्ट वरील डाव्या बाजूच्या कॉलरवर ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’ हा लोगो असणार आहे.

टी -20 मधील दोन सामने खेळल्यानंतर श्रीलंकेत स्पर्धाच रद्द       

दरम्यान, यापूर्वी युरोप मध्ये फुटबॉलच्या सामन्यांना सुरवात झाल्यानंतर काही खेळाडूंनी पुढे येत वर्णभेदाविरुद्ध जगभर सुरु झालेल्या  ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’ या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. कोरोनानंतर वेलेंसियाच्या खेळाडूंनी फुटबॉलच्या सरावाला प्रारंभ करताना एका गुडघ्यावर बसत, एक हात वर करत  ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’ आंदोलनाला समर्थन दिले होते. त्यानंतर स्पॅनिश फुटबॉल लीगच्या 'ला लीग' स्पर्धेत देखील अनेक खेळाडूंनी वर्णभेदाविरुद्ध सुरु असलेल्या या आंदोलनाला पाठिंबा दिला होता.                     

 


​ ​

संबंधित बातम्या