वेस्ट इंडिजच्या संघर्षमय विजयाने क्रिकेटमध्ये आली जान 

शैलेश नागवेकर
Monday, 13 July 2020

कोरोना महामारीमुळे बंद पडललेल्या क्रिकेटला चालना मिळाली आणि ताकदवान इंग्लंडचा पराभव करून वेस्ट इंडीजने त्यात जिवंतपणा आणला.

लंडन : कोरोना महामारीमुळे बंद पडललेल्या क्रिकेटला चालना मिळाली आणि ताकदवान इंग्लंडचा पराभव करून वेस्ट इंडीजने त्यात जिवंतपणा आणला. त्याचबरोबर कसोटी क्रिकेट अजिंक्‍यपद स्पर्धेच्या क्रमवारीतील आकडेही बदलले. इंग्लंड चौथ्या स्थानी कायम राहिले असले, तरी वेस्ट इंडीजने सातव्या क्रमांकापर्यंत प्रगती केली. 

विराट कोहली असलेल्या वर्ल्ड टी -20 संघाचे नेतृत्व हिटमॅन रोहितकडे   

117 दिवसांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर क्रिकेटचे पुनरागमन झाले आणि पहिल्या दिवशी पावसामुळे मोजक्‍याच षटकांचा खेळ झाला तरी इंग्लंड-विंडीज कसोटी सामना अखेरच्या क्षणापर्यंत चांगलाच रंगतदार झाला. विंडीज फलंदाजांनी अखेपर्यंत धैर्याने खेळ करून सामना जिंकला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 आघाडी घेतली. इंग्लंड-वेस्ट इंडिज हे दोनच संघ सध्या मैदानात उतरले असल्यामुळे आयसीसी कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेतील गुणतक्‍त्यात इतर कोणतेही बदल झाले नाहीत. विराट कोहलीची टीम इंडिया 360 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे; तर ऑस्ट्रेलिया 296 गुणांसह पाठलाग करत आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यातील ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका कमालीची चुरशीची होऊ शकेल. 

ENG vs WI : ऐतिहासिक सामन्यात विंडीजचा इंग्लंडवर विजय  

होल्डरकडून संघाचे कौतुक 
संपूर्ण सामन्यात आम्ही टीम म्हणून उत्तम खेळ केला. चौथ्या दिवशी केलेला पलटवार निर्णायक ठरला, असे मत वेस्ट इंडीजचा कर्णधार जेसन होल्डरने व्यक्त केले. कसोटी कारकिर्दीतील हा सर्वोत्तम क्षण आणि दिवस होता, असेही त्याने सांगितले. 

सचिन, विराटकडूनही अभिनंदन 
कोरोनानंतरचे क्रिकेट कसे असेल यासाठी मार्गदर्शक ठरलेल्या या सामन्याकडे संपूर्ण क्रिकेटविश्‍वाचे लक्ष होते. सर्वच जण टीव्हीवरून सामना पाहत होते. वेस्ट इंडीजने एकूणच केलेला खेळ आणि त्यातून मिळवलेल्या विजयाचे कौतुक होत आहे. विंडीजने सामना जिंकताच सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांनी लगेचच ट्विट करून त्यांचे अभिनंदन केले.


​ ​

संबंधित बातम्या