इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी वेस्ट इंडिजचा संघ जाहीर

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 3 June 2020

कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे वेस्ट इंडिजच्या तीन खेळाडूंनी संघातून नाव मागे घेतल्याचे देखील समोर आले आहे.

कोरोना व्हायरसमुळे जगभरात क्रिकेट सामने खेळणे बंद झाले आहे. क्रिकेटच्या सर्व पुर्वनियोजीत स्पर्घा स्थगीत करण्यात आले आहेत. जगभरातील क्रिकेट संघटना क्रिकेट पुन्हा सुरु करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. इंग्लड विरोधात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. ही क्सोटी मालिका 8 जुलै पासून खेळणे सुरु होणार असून हे सामने प्रेक्षकांवीना खेळण्यात येणार आहेत.

 

 

वेस्ट इंडिजचा जाहिर करण्यात आलेल्या संघामध्ये शिमरोन हेटमेयर, डॅरेन ब्राव्हो आणि कीमो पॉल या खेळाडूंना स्थान मिळाले नाही. कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे वेस्ट इंडिजच्या तीन खेळाडूंनी संघातून नाव मागे घेतल्याचे देखील समोर आले आहे. इंग्लड क्रिकेट बोर्डाने देखील वेस्ट इंडिज संघासोबत सामन्यांचे वेळापत्रक जाहिर केले आहे. कसोटी मालिका आठ जुलै पासून सुरु होणार आहे पण वेस्ट इंडिजचा संघ 8  जूनला इंग्लडसाठी रवाना होणार आहे.

इग्लंडला पोहचल्यानंतर वेस्ट इंडिज खेळाडू 14 दिवसांसाठी क्वारंटाईनमध्ये राहावे लागणार आहे. क्वारंटाईनचा काळ संपल्यानंतर वेस्टइंडिज संघ एगेस बाउल येथे मालिकेतील पहिली कोसोटी सामना खेळणार आहे. मालिकेसाठी निवड झालेला संघ पुढीलप्रमाणे आहे. जेसन होल्डर, क्रेग ब्रेथवेट, शाई होप, शेन डॉरिच, रोस्टन चेस, शेमार ब्रूक्स, रहकीम कॉर्नवॉल, एन्कुरमा बोनेर, अल्झारी जोसेफ, चेमार होल्डर, जॉन कँपबेल, रेमॉन रेफर, केमार रोच, जेर्मिन ब्लॅकवूड, शेनॉन गॅब्रिअल
 


​ ​

संबंधित बातम्या