विंडीज कर्णधार जेसन होल्डर म्हणतोय, तर लहान देशांचे क्रिकेट संपेल... 

शैलेश नागवेकर
Wednesday, 29 July 2020

कोरोना संकटाच्या काळात जैव सुरक्षा वातावरणाचा खर्च करण्याची क्षमता ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि भारत सारख्या क्रिकेट मंडळांमध्ये आहे. इतर देश हे आव्हान पेलू शकत नाही त्यामुळे आयसीसीने लहान देशांचे क्रिकेट वाचवायला हवे अशी मागणी वेस्ट इंडीजचा कर्णधार जेसन होल्डरने केली आहे.

मॅंचेस्टर : कोरोना संकटाच्या काळात जैव सुरक्षा वातावरणाचा खर्च करण्याची क्षमता ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि भारत सारख्या क्रिकेट मंडळांमध्ये आहे. इतर देश हे आव्हान पेलू शकत नाही त्यामुळे आयसीसीने लहान देशांचे क्रिकेट वाचवायला हवे अशी मागणी वेस्ट इंडीजचा कर्णधार जेसन होल्डरने केली आहे. अशा देशांना सातत्याने खेळण्याची संधी द्यावी असेही मत होल्डरने मांडले. 

स्टुअर्ट ब्रॉड 500 विकेट घेणारा सातवा गोलंदाज 

वेस्ट इंडीजविरुद्धची कालच संपलेली मालिका इंग्लंडने 2-1 अशी जिंकली. पण कोरोना महामारीत सर्व क्रिकेट बंद झालेले असताना साडे तीन महिन्यानंतर झालेली ही मालिका आंतरराष्ट्रीय क्रिकेटला नवी उमेद देणारी ठरली आहे. मालिकेत सहभागी झाल्याबद्दल वेस्ट इंडीज संघाचे विशेष कौतूक केले जात आहे. 
कोरोनाचा धोका असताना जैव सुरक्षा वातावरण तयार करणे हा यजमान संघटनेवर अधिक आर्थिक बोजा टाकणारा असतो. वेस्ट इंडीजसारख्या आमच्या मंडळांना ऐवढा अतिरिक्त खर्च करणे आव्हानात्मक असेल, असे होल्डरने सांगितले. 

तसेच एवढ्यात काही मार्ग निघाला नाही तर आर्थिक परिस्थिती कमजोर असलेल्या देशांचे क्रिकेट कमी होत जाईल. अगोदर चार ते पाच सामन्यांची मालिका खेळायचो आता त्यांची संख्या दोन ते तीन सामन्यांपर्यंत आली आहे. आमच्या देशात मालिका खेळायचे म्हटले तर खर्च परवडायला हवा, व त्यामुळेच संबंधितांनी लक्ष देऊन यावर मार्ग काढणे गरजेचे असल्याचे मत होल्डरने व्यक्त केले. 

भारत किंवा इंग्लंडविरुद्ध मालिका खेळल्यावर आमचा आर्थिक फायदा होत असतो. ऑस्ट्रेलियाविरुद्धही हीच स्थिती असते, पण इतरांविरुद्ध खेळणे हे नुकसान असते. त्यामुळे आत्ताची परिस्थिती पहाता या पुढे इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि भारतातच क्रिकेटचे सामने होऊ शकतील, अशी शक्‍यता होल्डरने व्यक्त केली. 

`वदे भारत'द्वारे परदेशी कुस्ती कोच भारतात    

कोरोना, लॉकडाउन आणि त्यामुळे आलेली आर्थिक मंदी यातून क्रिकेटही सुटलेले नाही. वेस्ट इंडीज खेळाडू आणि त्यांच्या प्रशासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या मानधनात कपात झालेली आहे. मुळात वेस्ट इंडीजसाठी गेली दोन वर्षे आर्थिकदृष्ट्या खडतर गेली होती. मानधन कपातीचे संकट कोसळले आहे. या वर्षाअखेरीपर्यंत एखादी मालिका कॅरेबियन देशांत आयोजित करू शकलो तर परिस्थिती थोडीफार सुधारू शकेल, असाही आशावाद होल्डरने व्यक्त केला.


​ ​

संबंधित बातम्या